Rafale Squadron's First Woman Pilot: बनारसची कन्या शिवांगी सिंह होणार राफेल विमानाची पहिली महिला पायलट; लहानपणापासूनच पाहिले होते वैमानिक होण्याचे स्वप्न

त्याच वेळी भारतीय हवाई दलात महिला लढाऊ पायलटांची भरती सुरू झाल्यानंतर

A Rafale fighter jet in action | (Photo Credit: PTI/File)

फ्रान्सहून राफेलचा (Rafale) ताफा भारतात झाल्यानंतर या लढाऊ विमानासाठी कोणता फायटर पायलट (Fighter Pilot) त्याचे उड्डाण करणार, याबाबत चर्चा होती. त्याच वेळी भारतीय हवाई दलात महिला लढाऊ पायलटांची भरती सुरू झाल्यानंतर, राफेल विमान उडवण्याचा बहुमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदार संघ असलेल्या बनारसची कन्या शिवांगी सिंहला (Shivangi Singh) मिळाला आहे. बनारसमध्ये लहानाची मोठी झालेली शिवांगीने बीएचयूमधून एनसीसी केल्यावर, भारतीय वायुसेनेचे राफेल स्क्वॉड्रन 'Golden Arrows' ची ती पहिली महिला फायटर पायलट बनली.

शिवांगी सध्या हवाई दलात फ्लाइट लेफ्टनंटचे पद भूषवत आहे. यापूर्वी तिने मिग-21 चालवले आहे. आता राफेल चालवण्यासाठी तिचे प्रशिक्षण अंबाला एअरफोर्स स्टेशनमध्ये सुरू झाले आहे. राफेल स्क्वॉड्रॉनला अंबाला हवाई दल स्थानकात ठेवण्यात आले आहे. शिवांगी 2017 मध्ये आयएएफ महिला फायटर पायलट बॅचमध्ये कमिशंड झाली होती. वायुसेनेचा भाग बनल्यापासून ती मिग-21 बायसनचे उड्डाण करत आहे. शिवांगीने अभिनंदन वर्धमानबरोबरही काम केले आहे, ज्यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मिग-21 बायसनमधून पाकिस्तानी एफ-16 हाणून पडले होते.

शिवांगीचे वडील कुमारेश्वर सिंह यांचा वाहतूक व्यवसाय आहे. आपली मुलगी बनारसचे नाव उजळवत आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला आहे. (हेही वाचा: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल)

फ्लाइट लेफ्टनंट शिवांगीचे लहानपणापासूनच पायलट होण्याचे स्वप्न होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने प्रतिष्ठित बनारस हिंदू विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे ती नॅशनल कॅडेट कोर्सेस अर्थात एनसीसीमध्ये रुजू झाली आणि 7 यूपी एअर स्क्वॉड्रॉनचा भाग बनली. यानंतर, तिने 2016 मध्ये एअर फोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. जेथे फ्लाइट लेफ्टनंट शिवांगीने आयएएफचे सर्वात जुने लढाऊ विमान मिग -21 बायसन उडविला आहे, तिथे ती तिचे नवीन लढाऊ विमान राफेल देखील उडण्यास सक्षम असेल. तिची सहकारी आणि आणखी एक लढाऊ पायलट, फ्लाइट लेफ्टनंट प्रतिभा, सध्या सुखोई-30 एमकेआयचे उड्डाण करीत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif