Rafale Induction Ceremony: राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी भारतीय वायुसेनेत औपचारिकरित्या दाखल; पहा दिमाखदार सोहळा
भारतीय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांच्या उपस्थितीत हवाईदलाच्या अंबाला विमानतळावर हा समारंभ पार पडला आहे.
भारतामध्ये आज (10 सप्टेंबर) अंबाला (Ambala) एअर बेसवर पाच राफेल लढाऊ विमानांची (Rafale Fighter Aircraft) पहिली तुकडी औपचारिकरित्या समारंभपूर्वक भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यातआली आहे. भारतीय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Defence Minister Rajnath Singh ) आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले (Minister of the Armed Forces of France Florence Parly) यांच्या उपस्थितीत हवाईदलाच्या अंबाला विमानतळावर हा समारंभ पार पडला आहे. भारतीय संस्कृतीनुसार विधिवत पूजा झाली. दरम्यान याप्रसंगी फ्रान्स आणि भारत सरकारचे उच्च पदस्थ अधिकारी तसेच सै न्य दलातील, वायुसेनेतील अधिकारी उपस्थित होते. जाणून घ्या राफेल लढाऊ विमानाची काय आहेत वैशिष्ट्यं .
राफेल लढाऊ विमान एका मिनिटात 60 हजार फुटांची उंची गाठू शकते. याची इंधन क्षमता 17 हजार किलोग्रॅम आहे. राफेल कुठल्याही प्रकारच्या हवामानात एका वेळी अनेक कामे करण्यास सक्षम आहे. म्हणून याला मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखले जाते. याच्यात असलेले स्काल्प क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करण्यात सक्षम आहे. राफेलची मारा करण्याची क्षमता 3 हजार 700 कि.मी. पर्यंत आहे तर स्काल्पची रेंज 300 कि.मी. आहे. विमानाची इंधन क्षमता 17 हजार कि.ग्रॅ. आहे. हे अँटी शिप अटॅक, परमाणू हल्ला, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लाँग रेंज मिसाइल अटॅकमध्ये अव्वल आहे. राफेल 24 हजार 500 किलोपर्यंतचं वजन वाहून नेऊ शकते आणि 60 तासांपर्यंत अतिरिक्त उड्डाण करू शकते. याचा वेग 2 हजार 223 कि.मी. प्रति तास आहे.
राफेल लढाऊ विमानांची सर्व धर्म पूजा
राफेल लढाऊ विमानांना Water cannon ची सलामी
वायुसेनेच्या परंपरेनुसार, नव्या विमानाचं स्वागत वॉटर कॅनने केले जाते. यामध्ये विमानावर पाण्याचा फवारा मारला जातो.
Aircraft Tejas कडून सलामी
आज राफेल जेट फायटर विमानांसोबत तेजस आणि जॅग्वार विमानांसोबत राफेलची कसरत पहायला मिळाली आहे.
दरम्यान 29 जुलै दिवशी फ्रान्स मधून पाच राफेल विमानांची तुकडी भारतामध्ये दाखल झाली होती. दरम्यान भारत आणि फ्रान्स सरकारने करार करत सुमारे 36 राफेल विमानं खरेदी केली आहेत. हा व्यवहार अंदाजे 59 हजार कोटी रूपयांचा झाला आहे. राफेल जेटची दुसरी तुकडी यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दाखल होणार आहे. दरम्यान 36 पैकी 30 फायटर असतील तर उर्वरित 6 हे ट्रेनर्स असतील.
आज या सोहळ्यापूर्वी फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ले यांना Guard of Honour देण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)