IPL Auction 2025 Live

Rahul Gandhi Met Sidhu Moose Wala's Family: राहुल गांधी यांनी घेतली सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट, म्हणाले 'दु:ख शब्दात सांगणे कठीण, न्याय मिळवू'

सिद्धु मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी त्यांच्या पंजाब येथील मूळ गावी गेले. येथे त्यांनी मुसेवाला यांचे आई-वडील आणि कुटुंबीयांची भेट घेतली.

Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter/ANI)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते दिवंगत सिद्धु मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सिद्धु मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी त्यांच्या पंजाब येथील मूळ गावी गेले. येथे त्यांनी मुसेवाला यांचे आई-वडील आणि कुटुंबीयांची भेट (Rahul Gandhi Met Sidhu Moose Wala's Family) घेतली. काँग्रेस पक्षाचे इतर नेतेही उपस्थित या वेळी होते. राहुल गांधी यांना पाहून सिद्धु मुसेवाला यांच्या वडीलांना अश्रू अनावर झाले. राहुल गांधी यांनी म्हटले की, मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भावना शब्दात सांगणे अशक्य आहे. मुसेवाला यांना न्याय मिळवून देऊ.

सिद्धु मुसेवाला यांच्या हत्येनंतर प्रदीर्घ काळानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल गांदी यांनी सिद्धु मुसेवाला यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहीली. सिद्धु मुसेवाला हे लोकप्रिय पंजाबी गायक होते. याशिवाय ते काँग्रेस पक्षाचे नेतेही होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उमेदवार होते. काही दिवसांपूर्वीच (29 मे) रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे सिद्धु मुसेवाला यांच्या हत्येपूर्वी एकच दिवस पंजाबमधील अनेक लोकांची 424 व्हीआयपी सुरक्षा पंजाब पोलिसांनी काढून घेतली होती. त्यात सिद्धु मुसेवाला यांचाही समावेश होता.  (हेही वाचा, Sidhu Moose Wala Murder Case: सिद्धू मूसेवालाच्या वडिलांनी गायकाच्या हत्येची CBI, NIA चौकशी करण्याची केली मागणी)

ट्विट

मुसेवाला यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांची विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेट घेतली. पाठिमागच्या सोमवारी काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही सिद्धु मूसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी त्यांनी त्यांच्या वडीलांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी आरोपींवर कडक कारवाईची मागणी पंजाब सरकारला केली. भाजपकडून हंसराज हंस आणि मंजिंदर सिंह सिरसा यांनीही सिंदुधु यांच्या परिवाराची भेट घेतली. मुसेवाला यांच्या शरीराला 19 गोळ्या लागल्या. गोळीबारानंतर अवघ्या 15 मिनीटातच मुसेवाला यांचा मृत्यू झाला.

ट्विट

पंजाब पोलिसांनी मुसेवाला यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. मुसेवाला यांच्या हत्येमुळे पंजबाचे राजकारण आणि एकूणच देशभरात अनेकांना धक्का बसला आहे. प्रसारमाध्यमे सोशल मीडिया आणि विविध स्तरांवर या हत्येची जोरदार चर्चा सुरु आहे.