Kumar Vishwas On Arvind Kejriwal: कुमार विश्वास यांचा धक्कादायक दावा, 'पंजाबचा CM बनेन किंवा खलिस्तानचा पहिला PM असे केजरीवाल म्हणाले'
आम आदमी पक्षाचे (AAP) माजी नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासून असलेल्या कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
आम आदमी पक्षाचे (AAP) माजी नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासून असलेल्या कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 'पंजाबचा CM बनेन किंवा खलिस्तानचा पहिला PM' असे केजरीवाल यांनी बोलताना एकता आपल्याला सांगितले होते, असे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. कुमार विश्वास यांनी दावा करत म्हटले आहे की, अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये फुटीरतावाद्यांचे नेतृत्व करत आहे. आपण पंजाब राज्याचा मुख्यमंत्री बनेन किंवा स्वतंत्र पंजाब राष्ट्र (खलिस्तान) (Khalistan) चा पंतप्रधान असे अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला सांगितले होते, असे विश्वास यांनी म्हटले आहे.
कुमार विश्वास हे अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे निकटवर्तीय आहेत. अण्णा हजारे यांनी चालवलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात ते आणि केजरीवाल एकमेकांचे सहकारी राहिले आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांचे रामलीला मैदानावरचे आंदोलन संपले आणि पुढे अण्णा हजारे यांनी आम आदमी पक्ष स्थापन केला. या वेळीही कुमार विश्वास हे केजरीवाल यांच्या जवळचे होते. मात्र, पुढे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आणि दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. कालांतराने कुमार विश्वास यांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यापासून स्वत:ला दूर केले. (हेही वाचा, PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिलांसोबत भजन, कीर्तन; संत रविदास मंदिरात पूजाही केली)
कुमार विश्वास यांनी केलेल्या दाव्यामुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कुमार विश्वास यांनी म्हटले आहे की, केजरीवाल यांनी त्यांना सांगतले होते की, भगवंत कौर किंवा इतर कोणाला तरी चेहरा बनवून पंजाबमध्ये निवडणूक लढवायची आणि पुढे स्वत: मुख्यमंत्री बनायचे. हे शक्य नाही झाले तर कोणाला तरी बाहुला म्हणून खुर्चीवर बसवायचे आणि आपणच सत्ता करायची, असेही केजरीवाल यांचा हेतू असल्याचे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. दरम्यान, कुमार विश्वास यांनी केलेल्या दाव्यावर केजरीवाल यांची प्रतिक्रिया काय येते याबाबत उत्सुकता आहे.