Pulwama Terror Attack ते Surgical Strike 2 चा घटनाक्रम,भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे

एअर स्ट्राईकद्वारा सुरक्षितपणे हल्ला करण्याचा प्रयत्न नक्कीच भारतीय वायुसेनेचं मोठं यश आहे.

Surgical Strike 2 (File Photo )

Surgical Strike 2:   14 फेब्रुवारीच्या दुपारी जैश ए मोहम्मद(Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेने भारताच्या सीआरपीएफ जवानांच्या बस ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान ठार झाले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर (Pulwama Terror Attack) केवळ भारतामध्ये नव्हेच जागतिक स्तरावर त्याचे पडसाद उमटले. भारतीय जवानांवरील हल्ल्याचा आता भारताने बदला घेतला आहे. आज भारताने सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. बालाकोट येथे एअर स्ट्राईक करण्यात आला आणि जैश ए मोहम्मदचे कॅम्प उडवण्यात आलं आहे.

सर्जिकल स्ट्राईक 2 चा घटनाक्रम

पुलवामा हल्ल्याचा बदला घ्यावा अशी प्रत्येक भारतीयांच्या मनात इच्छा होती. सैनिकांचे जीव धोक्यात न घालता एअर स्ट्राईकद्वारा सुरक्षितपणे हल्ला करण्याचा प्रयत्न नक्कीच भारतीय वायुसेनेचं मोठं यश आहे.