IPL Auction 2025 Live

Pulwama Attack Anniversary: पुलवामा हल्ला वर्षपूर्ती निमित्त केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंंग सह भारतीयांनी वाहिली शहीद CRPF जवानांना श्रद्धांजली

या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील देखील दोन जवानांनी आपला जीव गमावला होता.

Pulwama Attack Site | (Photo Credits: PTI)

Pulwama Attack Anniversary 2020: वर्षभरापूर्वी कुटुंबाला भेटून परतणार्‍या CRPF च्या जवानांच्या ताफ्यातील एक बसवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये जागीच 40 जवान ठार झाले होते. या भारतीय जवानांवरील सर्वात भीषण हल्ल्याची आज वर्षपूर्ती आहे. दरम्यान या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून आदरांजली अर्पण केली जात आहे. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील देखील दोन जवानांनी आपला जीव गमावला होता. Pulwama Terror Attack: पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या 42 CRPF जवानांची संपूर्ण लिस्ट.  

जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुदसिर अहमद खान याने पुलवामा हल्ल्याची योजना आखली होती. वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ल्यात 41 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. मुदस्सिरने आत्मघाती हल्ला घडवण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहन आणि स्फोटके मिळवून दिली होती. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. Pulwama Attack Anniversary: पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 1 वर्षे पूर्ण; अजूनही ताज्या आहेत जखमा, ज्याने देशाचा चेहरामोहरा बदलला

अमित शहा यांचे ट्वीट

राजनाथ सिंह यांचे ट्वीट

CRPF चे ट्वीट  

 वसुंंधरा राजे यांचे ट्वीट

वर्षभरापूर्वी झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 41 जवानांच्या स्मृतीस्थानी बांधलेल्या स्मारकाचे आज (14 फेब्रुवारी) लेथपुरा कॅम्पमध्ये उद्घाटन होणार आहे.