Puja Khedkar Case: पूजा खेडकर ने UPSC च्या Cancellation of Candidature विरूद्ध दिल्ली हाय कोर्टात मागितली दाद
हे प्रेस रीलीज पूजा साठी अधिकृतपणे तिचं IAS पद रद्द झाल्याची माहिती देणारं पत्र असल्याचं UPSC ने म्हटलं आहे.
पूजा खेडकर (Puja Khedkar) विरूद्ध यूपीएससी (UPSC) ने कारवाई करत तिचं आयएएस (IAS) पद रद्द केल्यानंतर आता पूजा या निर्णयाविरूद्ध दिल्ली उच्च न्यायालयामध्ये (Delhi High Court) गेली आहे. Justice Jyoti Singh यांच्या बेंचकडून या प्रकरणाची आज(7 ऑगस्ट) सुनावणी घेण्यात आली. कोर्टामध्ये पूजा खेडकरची बाजू Sr Adv Indira Jaising यांनी मांडली आहे. पूजाने कोर्टात वकिलांकडून दिलेल्या माहितीनुसार, तिचं पद रद्द केल्याची अद्याप तिला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 'आपल्याकडे कोणतीही ऑर्डर नाही केवळ प्रेस रीलीज असल्याचं' वकिलांनी सांगितलं आहे. दरम्यान प्रेस रीलीज नव्हे तर मला तशी ऑर्डर द्या म्हणजे योग्य त्या ठिकाणी मला या निर्णयाविरूद्ध दाद मागता येईल अशी मागणी तिने केली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयामध्ये यूपीएससी कडून आज Naresh Kaushik उपस्थित होते. पूजा नेमकी कुठे आहे ? याची माहिती नसल्याने प्रेस रीलीज जारी करण्यात आलं आहे. हे प्रेस रीलीज पूजा साठी अधिकृतपणे तिचं IAS पद रद्द झाल्याची माहिती देणारं पत्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
UPSC कडून येत्या दोन दिवसात पूजा खेडकरला तिचं IAS पद रद्द केलं गेलं असल्याची माहिती देणारी ऑर्डर मिळेल असं कोर्टात सांगण्यात आलं आहे. यावेळी कोर्टाने तिला यूपीएससी च्या निर्णयाविरूद्ध योग्य व्यासपीठावर दाद मागण्याची मुभा असल्याचं म्हटलं आहे. (हेही वाचा -UPSC to Revamp Exam System: पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीचा मोठा निर्णय; परीक्षा पद्धतीत होणार अनेक मोठे बदल, जाणून घ्या सविस्तर ).
पूजा खेडकरची उच्च न्यायालयात धाव
31 जुलै दिवशी पूजा खेडकर वर कारवाई करत यूपीएस सी कडून तिचं पद काढण्यात आलं आहे. भविष्यातही पूजा खेडकर परीक्षा देऊ शकत नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. पूजा वर खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. दरम्यान तिने नावात बदल करून परीक्षा दिल्याच्या, प्रशिक्षणार्थी असताना अवाजवी मागण्या केल्याचाही तिच्यावर आरोप आहे.