Kerala Xmas-New Year Bumper Lottery: रातोरात मालामाल, तब्बल 20 कोटी रुपयांचा मालक, पुद्दुचेरी येथील व्यक्तीने जिंकली ख्रिसमस-नवीन वर्षाची लॉटरी
पुद्दुचेरी (Puducherry) येथील एक 33 वर्षीय व्यावसायिक एका रात्रीत मालामाल झाला आहे. हा व्यवसायिक थोडाथोडका नव्हे तर तब्बल 20 कोटी रुपयांचा मालक झाल्याचे समजते. या तरुण व्यवसायिकाने सबरीमाला यात्रेदरम्यान केरळ येथील ख्रिसमस-न्यू इयर बंपर लॉटरी (Kerala Xmas-New Year Bumper Lottery) जिंकली आहे.
पुद्दुचेरी (Puducherry) येथील एक 33 वर्षीय व्यावसायिक एका रात्रीत मालामाल झाला आहे. हा व्यवसायिक थोडाथोडका नव्हे तर तब्बल 20 कोटी रुपयांचा मालक झाल्याचे समजते. या तरुण व्यवसायिकाने सबरीमाला यात्रेदरम्यान केरळ येथील ख्रिसमस-न्यू इयर बंपर लॉटरी (Kerala Xmas-New Year Bumper Lottery) जिंकली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या विजेत्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे त्याची ओळख अज्ञात राहिली आहे. दरम्यान, विजेत्याने आपले तिकीट तिरुअनंतपुरममधील लॉटरी संचालनालयाला सादर केले. संचालनालयाने हे तिकीट स्वीकारले असून त्याची ओळख पटवली आहे. त्याचे नाव गोपनीयतेमुळे जाहीर न करण्याचा पर्याय निवण्यात आला आहे.
विजेत्याचे नाव गोपीनीय
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विजेत्या व्यवसायिकाने पद्मनाभ स्वामी मंदिराच्या लक्ष्मी सेंटर ईस्ट नाडा येथील सब-एजंटकडून लॉटरीची तिकिटे विकत घेतले. लॉटरीचा निकाल जाहीर होताच विजयी व्यावसायिकाने तिरुअनंतपुरममधील ख्रिसमस-न्यू इयर बंपर लॉटरी संचालनालयाशी संपर्क शुक्रवारी साधला. तोपर्यंंत त्याच्या विंडफॉलचा खुलासा लपवून ठेवणे पसंत केले. विजेत्याने आवश्यक कागदपत्रांसह विजेते तिकीट सादर केले. संचालनालयाने प्रसारमाध्यमांसमोर विजेत्याचे वैयक्तिक तपशील उघड करण्यास नकार दिला. प्राप्त माहितीनुसार, 20 कोटी रुपयांच्या बक्षीसासाठी विजेते तिकीट क्रमांक XC-224091 होता. पलक्कड येथील शाहजहान नावाच्या लॉटरी एजंटने त्याची विक्री केली होती. काही आठवड्यांपूर्वी तिरुअनंतपुरममधील दुसऱ्या सब-एजंटला तिकीट विकण्यात आले होते. (हेही वाचा, Maharashtra State Lottery: लवकरच ऑनलाईन विकत घेता येणार लॉटरीची तिकीटे; उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे निर्देश)
लॉटरी संचालनालयाचा प्रसारमाध्यमांकडे खुलासा
लॉटरी संचालनालयाच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना खुलासा केला की, विजेत्याच्या विनंतीनुसार आम्ही त्याचे नाव जाहीर करणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव आपले नाव जाहीर करु नये, अशी विनंती विजेत्याने आपल्याकडे केली आहे. त्यामुळे आपण ते जाही करु शकत नसल्याचे म्हटले. ख्रिसमस-न्यू इयर बंपर लॉटरी तिकीट बक्षीस रकमेच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जी फक्त तिरुवोनम बंपरच्या मागे आहे. या वर्षीच्या आवृत्तीत 20 भाग्यवान व्यक्तींना प्रत्येकी 1 कोटी रुपयांच्या दुय्यम बक्षिसांसह 20 कोटी रुपयांचे भव्य बक्षीस देण्यात आले आहे. कर आणि एजंटच्या कमिशनच्या कपातीनंतर, प्रथम पारितोषिक प्राप्तकर्त्याला अंदाजे 12 कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. (हेही वाचा, Thailand मध्ये परदेशी पतीच्या अपरोक्ष पत्नीने लॉटरी जिंकून मांडला दुसरा संसार)
लॉटरीचे निकाल कसे तपासायचे आणि बक्षिसांचा दावा कसा करायचा
तुम्ही विजेते आहात का हे तपासण्यासाठी, www.keralalotteries.net किंवा keralalotteryresult.net ला भेट द्या. विजेते वर्तमानपत्रात किंवा त्यांनी तिकीट खरेदी केलेल्या दुकानात देखील परिणाम सत्यापित करू शकतात. तुम्ही भाग्यवान विजेते असल्यास, तिरुअनंतपुरममधील बेकरी जंक्शनजवळील गोर्की भवन येथील केरळ लॉटरी कार्यालयांना भेट देऊन 30 दिवसांच्या आत तुमच्या बक्षीसावर दावा करा. तुमचे विजेते तिकीट आणि वैध आयडी आणायला विसरू नका.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)