प्रियांका गांधी लोकसभा निवडणुक लढवणार नाही?

काँग्रेस पक्षात महासचिव पद देण्यात आलेल्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आगमी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election) लढवणार नसल्याचे पक्षातील सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Priyanka Gandhi (Photo Credits-Twitter)

काँग्रेस पक्षात महासचिव पद देण्यात आलेल्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आगमी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election) लढवणार नसल्याचे पक्षातील सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. तसेच जानेवारी महिन्यात प्रियांका गांधी यांना अधिकृतरित्या काँग्रेस (Congress) पक्षात महासचिवपद देण्यात आले होते. त्याचसोबत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांना पूर्व उत्तर प्रदेशात प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले आहे. प्रियांका गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे आमदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना पश्चिम यूपीमध्ये पद देण्यात आले आहे.

सुत्रांचे असे म्हणणे आहे की, आगमी लोकसभा निवडणुक प्रियांका गांधी लढवणार नाहीत. तसेच निवडणुकीबद्दलच्या कोणत्याही रॅलीमध्ये त्या सहभागी होणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वत: रॅली आणि भाषण देणार असल्याची जबाबदारी स्विकारली आहे. मात्र प्रचारामध्ये राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी असतील असे ही सांगण्यात आले आहे. प्रियांका गांधी यांनी पक्षात पदार्पण केल्यानंतर युपी येथील काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करण्याचे जबाबदारी दिली आहे. त्यानंतर प्रियांका आणि राहुल गांधी एका रोड शोमधून शक्तिप्रदर्शन केले होते.(हेही वाचा-लखनऊ येथे प्रियांका गांधी यांच्या 'रोड शो' वर जनतेचे लक्ष, पोस्टरमधून मोदी सरकारवर निशाणा)

काँग्रेस पक्षात पाऊल ठेवल्यानंतर अद्याप प्रियांका गांधी यांनी कोणत्याही ठिकाणी सार्वजनिक मंचावर भाषण दिले नाही आहे. तर लखनऊ येथील रोड शो पासून ते पक्ष कार्यालयाच्या भाषणाची जबाबदारी राहुल गांधी यांनी स्विकारली होती. मात्र प्रियांका गांधी यांनी दिल्ली ते युपी पर्यंत बैठका घेतल्या होता. परंतु प्रियांका गांधी पडद्याच्या पाठी राहूनच पक्षात काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif