पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 4 वाजता देशाला करणार संबोधित
देशभरात लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही आज संपणार आहे.
भारतात एकीकडे सुरु कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) सुरु असलेले युद्ध तर दुसरीकडे लडाखच्या गलवान घाटीत शहीद झालेल्या भारतीय सैन्याविरुद्ध देशभरात चीन विरुद्ध पुकारलेले बंड या सर्वांवर नजर टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज देशाला संबोधित करणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते देशवासियांशी संवाद साधतील. देशभरात लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही आज संपणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत नरेंद्र मोदी काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर अनलॉक 1 च्या पुढे काय याबाबतही मोदीची महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे.
रविवारी (28 जून) रोजी 'मन की बात' (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमातून मोदींनी जनतेशी संवाद साधला. त्यानंतर आता आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते देशाला संबोधित करणार आहे.
भारतीय शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, भारत चीनला जशाच तसे उत्तर देईल असे मोदींनी मन की बात या कार्यक्रमातून सांगितले होते. केंद्र सरकारने सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने सोमवारी टिकटॉकसह 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
यामागची भूमिका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने नुकतीच लॉकडाउन मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो रेल, सिनेमे, जिम, तलाव, धार्मिक कार्यक्रम 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच ककंटेनमेंट झोनबाहेरील केंद्र व राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्थांना 15 जुलैपासून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.