CII Annual Session: ही वेळ देशाची जनता, अर्थव्यवस्थेला वाचविण्याची- पंतप्रधान नरेंद्र मोदी
मला शेतकरी, एमएसएमई आणि उद्योग दिग्गजांवरही विश्वास आहे. त्यामुळे मी आत्मविश्वासाने हे सांगू शकतो की, देश विकासाच्या मार्गावर पुनरागमन करेन.
Getting Growth Back पासून पुढे जात मी सांगू शकतो की Yes ! We will definitely get our growth back. आपल्यापैकी काही लोक विचार करु शकतात की, या संकटाच्या काळात मी आत्मविश्वासाने हे बोलूच कसे शकतो. माझ्या आत्मविश्वासाची अनेक कारणं आहेत, हे शब्द आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योग परिसंघ (Confederation of Indian Industry) कार्यक्रमात मंगळवारी (2 जून 2020) सहभाग नोंदवला. या वेळी ते बोलत होते. या वेळी बोलताना मोदी म्हणाले की, लॉकडाऊन नियमांमध्ये शिथीलता दिल्याने देशभरातील औद्योगिक क्षेत्र पुन्हा सुरु होत आहेत. अनेक कंपन्या, कारखाने सुरु झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी सांगितले की, अत्यंत कठीण काळातून देशातील जनतेला वाचविण्याची ही वेळ आहे. त्यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही आपल्याला वाचवायचे आहे. या श्रृंखलेत भारत लॉकडाऊन पाठिमागे टाकूण अनलॉक 1 च्या दिशेने निघाला आहे. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, मला भारताच्या क्षमता, कल्पकता आणि उद्योग विश्वातील नव्या ज्ञानावर भरवसा आहे. मला शेतकरी, एमएसएमई आणि उद्योग दिग्गजांवरही विश्वास आहे. त्यामुळे मी आत्मविश्वासाने हे सांगू शकतो की, देश विकासाच्या मार्गावर पुनरागमन करेन. (हेही वाचा, Mann Ki Baat: भारताची लोकसंख्या जास्त असूनही कोरोना इतर देशांप्रमाणे पसरला नाही हे खरे भारतीयांचे यश- पंतप्रधान नरेंद्र मोदी)
ट्विट
व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारा करण्यात येणारा हा कार्यक्रम भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) स्थापनेला 215 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल करण्यात आला आहे. भारतीय उद्योग परिसंघाची स्थापना 1895 मध्ये झाली. सीआयआयच्या 125 व्या वर्धापन कार्यक्रमाचा मुख्य विषय आहे ‘गेटिंग ग्रोथ बैक' म्हणजेच विकासाच्या वाटेवर पुन्हा परतने.
दरम्यान, दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात पिरामल समूहाचे चेअरमन अजय पिरामल, आईटीसी लिमिटेड चेअरमन आणि सीएमडी संजीव पुरी, बायोकॉन सीएमडी किरण मजुमदार शॉ, भारतीय स्टेट बँक (एसबीआई) चेअरमन रजनीश कुमार, कोटक महिंद्रा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी एवं सीआईआईचे अध्यक्ष उदय कोटक आणि सीआईआई अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांच्यासारखे कॉर्पोरेट विश्वातील अनेक प्रमुख प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.