Coronavirus: कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नव्हता: पंतप्रधान नरेंद्र मोदी

अन्यथा पुढे त्याचा भयंकर परिणाम सहन करावा लागतो. कोरना व्हायरस संकटाने जगाला विळखा घातला आहे. कोरोना संकट हे जात, पात, धर्म, देश अशा कोणत्याही सीमा पाहात नाही.

Mann KI Baat | PM Narendra Modi | (Photo Credit: ANI)

कोरोना व्हायरस  (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी दुसरा कोणता पर्यायच नव्हता. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. या निर्णयाचा अनेकांना त्रास होतो आहे. परंतू, या लढाईत आम्हाला जिंकायचे आहे. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले. जगभरातील देशांचा अनुभव लक्षात घेता आमच्याकडे हाच एक मार्ग होता. ज्यामुळे आपण, आपला परिवार आणि समाज सुरक्षीत राहू शकेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायर संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमातून जनतेशी संवाध साधला. या वेळी ते बोलत होते.

या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले  ''कोणत्याही आजाराचा उपाय हा सुरुवातीलाच करावा  लागतो. अन्यथा पुढे त्याचा भयंकर परिणाम सहन करावा लागतो. कोरना व्हायरस संकटाने जगाला विळखा घातला आहे. कोरोना संकट हे जात, पात, धर्म, देश अशा कोणत्याही सीमा पाहात नाही. त्यामुळे जगभरातील अखंड मानव जातीने एकत्र येऊन त्याचा सामना करायला हवा''.

''काही लोकांना असे वाटते की, जग लॉकडाऊ झाल्यामुळे आपल्याला कोरोना व्हायरसची चिंता नाही. पण, असा विचार करणे एक भ्रम आहे. हा लॉकडाऊन हा आपल्या सर्वांसाठी आहे. व्यक्तिगत पातळीवर स्वत:, कुटुंब आणि समाजासाठी. म्हणूनच सर्वांनी घरातच थांबाला हवे. कोणत्याही स्थिती गर्दी टाळायला हवी. तरच कोरोना व्हायरसचा सामना आपण करु शकतो'',  असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. (हेही वाचा, Lockdown-COVID-19: कोरोना व्हायरस हेल्पलाईन नंबर; देशभरातील राज्यांसह पाहा तुमच्या राज्याचा Coronavirus Helpline Number)

पुढे बोलताना पंतप्रधा नरेंद्र मोदी म्हणाले, 'जगभरातील देश गर्दी टाळून आणि लॉकडाऊनचे सहकार्य करुनच कोरोनावर नियंत्रण मिळवत आहेत. जे लोक आवश्यक काळजी घेत नाहीत. ते आपल्या आयुष्याशी फार मोठा खेळ खेळत आहेत. देशातील अनेक लोक एका सैनिकाप्रमाणे कोरोना व्हायरस विरोधात लढा देत आहेत. यात आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर, परिचारीका, केंद्र सरकार, राज्यसरकार आदी कर्मचारी, पोलीस आणि देशातील अनेक नागरिक, संस्थांचा समावेश आहे, असे कौतुगोद्गारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif