केदारनाथ नंतर आज नरेंद्र मोदी यांनी घेतले बद्रीनाथ मंदिरात दर्शन
केदारनाथकडे विजयासाठी प्रार्थना केली का? असा प्रश्न विचारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना आपण देवाकडे काहीच मागत नाही देवाने आपल्या देण्यासाठी बनवलं आहे काहीच मागण्यासाठी नव्हे.
केदारनाथ मंदिर परिसरातील गुंफेमध्ये 15 तास ध्यानधारणा केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बद्रीनाथाच्या दर्शनाला पोहचले. काही वेळापूर्वी गळ्यात तुळशी माळा गळ्यात घातलेल्या नरेंद्र मोदींची पहिली झलक पहायला मिळाली आहे. आज लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडत आहे. यामध्ये नरेंद्र मोदी लढत असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. प्रचार संपला, एकही उत्तर न देता पत्रकार परिषद आटोपली, आता नरेंद्र मोदी केदारनाथच्या चरणी लीन, केली ध्यान धारणा
ANI Tweet
दोन दिवसांच्या उत्तरखंड दौर्यावर असलेले नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दिल्लीला परतणार आहेत. हिवाळ्यात सहा महिने बंद ठेवलेली चार धाम यात्रा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 10 मे पासून गंगोत्री यमुनात्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले आहेत.
केदारनाथवर भगवान शंकराचा तर बद्रीनाथवर भगवान विष्णूचं वास्तव्य होते असे सांगितले जाते. स्थानिक ऑफिसर्ससोबत नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ परिसरामध्ये विकासकामांचा आढावा घेतला. मागील तीन वर्षामधील केदारनाथला मोदींनी दिलेली ही तिसरी भेट आहे.
केदारनाथकडे विजयासाठी प्रार्थना केली का? असा प्रश्न विचारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना आपण देवाकडे काहीच मागत नाही देवाने आपल्या देण्यासाठी बनवलं आहे काहीच मागण्यासाठी नव्हे. दरम्यान नरेंद्र मोदी यांच्या देवदर्शनावर विरोधकांनी टीका केली आहे.