पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणी, विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; कटात पाकिस्तानचा हात असल्याचे वृत्त

जी NIAला पठविण्यात आली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रपती रमनाथ कोविंद, विराट कोहली यांसह अनेकांची नावे आहेत.

Narendra Modi, Virat Kohali | (Photo Credit: Archived, edited, representative images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे खळबळजनक वृत्त आहे. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने प्राप्त दस्तऐवजांच्या आधारे हे वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, देशातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांवर दहशतवादी हल्ला करण्याचा दहशतवादी संघटनेचा कट आहे. तसेच, या कटात पाकिस्तानचा हात असल्याचेही प्रथमदर्शनी वृत्त आहे.

ऑल इंडिया लश्कर-ए-तैयबा नावाच्या दहशतवादी संघटनेने एक यादी तयार केली आहे. जी NIAला पठविण्यात आली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रपती रमनाथ कोविंद, भाजप कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक, भाजप महासचिव राममाधव, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या नावाचा समावेश आहे.

कलम 370 जम्मू-काश्मीरमधून हटविल्यानंतर पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे भारताच्या या निर्णयाविरोधात पाकिस्तान हालचाली करत आहे. सुरुवातीला पाकिस्तानने भारताच्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय समुदयाकडे दाद मागितली. मात्र, जगभरातील देशांनी त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा आपल्या पारंपरीक मार्गांनी भारताची आडवणूक करण्याच्या विचारात असल्याचे त्याच्या हालचालीवरुन दिसत आहे.