पंतप्रधान नरेंद्र मोदी 'काश्मिरी' विद्यार्थ्यांच्या पाठीशी, आपला लढा 'काश्मिर' साठी आहे, काश्मिरींविरुद्ध नसल्याची घोषणा
सध्या काश्मिरी तरुणांवरील हल्ल्याची प्रकरण पाहता त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुलवामा (Pulwama) येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. अनेक भारतीयांना या भ्याड हल्ल्याचा बदला घ्यायचा आहे. मात्र काही अतिउत्साही तरुणांनी रागाच्या भरात देशात ठिकठिकाणी शिकणाऱ्या काश्मिरी तरुणांना मारहाण केली. आज राजस्थान येथील एका प्रचार सभेत बोलताना मोदींनी (Narendra Modi) काश्मिरी तरुणांवर (Kashmiri Student) होणाऱ्या हल्ल्याचा निषेध केला आहे. आपली लढाई काश्मिरसाठी आहे. काश्मिरविरोधात किंवा काश्मिरींविरुद्ध नाही असं म्हटलं आहे. भारतामध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांवर होणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काश्मिरी तरुणांना मारहाण करत त्यांना जबरदस्तीने ' वंदे मातरम' बोलायला लावले होते. असाच प्रकार देशभर विविध ठिकाणी झाला. युवासेनेने संबंधित कार्यकर्त्यांची हाकलपट्टी केली आहे.जिबरान नाझीर या काश्मिरी पत्रकाराला पुण्यात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. Pulwama Terror Attack निषेधार्थ काश्मिरी तरूणांवर होणार्या हल्ल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारसह, 10 राज्यांना नोटिस
सध्या काश्मिरी तरुणांवरील हल्ल्याची प्रकरण पाहता त्यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.