तामिळनाडू : 15 फूट उंचीच्या मूर्तीची पूजा करताना पाय घसरून कोसळला पुजारी, दुर्देवी मृत्यू (Video)

तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) एका पुजार्‍याचा मूर्तीचा हार व्यवस्थित करताना पाय घसरून कोसळल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Tamil Nadu Priest falls to death(Photo Credit-You Tube/Times Now)

तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu)  एका पुजार्‍याचा मूर्तीचा हार व्यवस्थित करताना पाय घसरून कोसळल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. 15 फूट उंचीच्या मूर्तीचा हार नीट करण्यासाठी व्यकंटेश हे पुजारी वर चढले होते. मूर्तीजवळ उभं राहता यावं यासाठी एक फळी ठेवण्यात आली होती. हार नीट करून मागे येताना व्यंकटेश (Vyankatesh) अगदीच टोकाजवळ आले आणि घसरून खाली पडले. त्यांना नजीकच्या रूग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

तामिळनाडूच्या मंदिरात घडलेला हा दुर्देवी प्रकार कॅमेर्‍यात चित्रीत झाला आहे. टाईम्स नाउ या वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. देवाचा हार नीट मागे सरकताना व्यंकटेश यांचा तोल गेला. त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र थेट खाली कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मुर्तीजवळ असलेल्या अन्य पुजार्‍यांनी आणि भक्तांनी त्यांना तात्काळ मदत केली मात्र व्यंकटेश यांचा मंदिरात झालेल्या या दुर्देवी अपघातामध्ये मृत्यू झाला.