Citizenship Amendment Bill वर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी; विधेयकाचे कायद्यात रूपांतर
लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर रात्री (12 डिसेंबर) उशिरा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विधेयकावर स्वाक्षरी करत त्याचे कायद्यामध्ये रूपांतर केले आहे.
लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर रात्री (12 डिसेंबर) उशिरा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विधेयकावर स्वाक्षरी करत त्याचे कायद्यामध्ये रूपांतर केले आहे. लोकसभा, राज्यसभा मध्ये विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर ईशान्य भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतामध्ये आसाम, त्रिपुरा, मणिपूर या भागामध्ये ताणावाची स्थिती निर्माण झाली असून केंद्र सरकारकडून या भागात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावला आहे. तर इंटरनेटसेवा देखील बंद करण्यात आली आहे.
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकामुळे कायदा बनल्याने आता हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी धर्मांच्या लोकांना 31 डिसेंबर 2014 पर्यंत पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान मधून भारतामध्ये आल्यास त्यांना भारतीयत्व मिळणार आहे. Citizenship Amendment Bill सरकारची कसोटी पाहणारं नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक नेमकंं आहे काय?
ANI Tweet
सध्या नागरिकत्व दुरूस्ती विधेयक संसदेमध्ये लागू झाल्यानंतर देशभरात त्याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींनी त्याचे स्वागत केले आहे तर काहीं स्तरातून नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला विरोध करण्यात आला आहे. आसाममधील लोकांना शांततेचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामवासीयांना त्यांचे हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सरकार त्यांचा राजकीय वारसा, भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी कार्य करू असे आश्वासन दिले आहे.