Pravesh Shukla Into Custody: प्रवेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात, आदिवासी तरुणावर लघवी केल्याचे प्रकरण (Watch Video)

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी मद्यधुंद अवस्थेत पुरुषाच्या चेहऱ्यावर लघवी करताना दिसत आहे. लघवी करणारा तो व्यक्ती हाच प्रवेश शुक्ला (Pravesh Shukla) असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Pravesh Shukla | (Photo Credit - ANI/ Twitter)

Urinating on Tribal Youth Case: तरुणावर लघवी करणाऱ्या प्रवेश शुक्ला (Pravesh Shukla) नामक आरोपीस पोलिसांनी (Madhya Pradesh Police) ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी मद्यधुंद अवस्थेत पुरुषाच्या चेहऱ्यावर लघवी करताना दिसत आहे. लघवी करणारा तो व्यक्ती हाच प्रवेश शुक्ला (Pravesh Shukla) असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरु केली आहे. लवकरच त्याच्यावर पुढील कारवाई सुरु केली जाईल, असे सिधी येथील अप्पर पोलीस अधिक्षक अंजुलता पटले यांनी म्हटले आहे. दरम्यान, ही घटना जिल्ह्यातील कुबरी गावात घडली. प्रवेश शुक्ला असे आरोपीचे नाव असून तो कुबरी गावचा रहिवासी आहे. तर, दशमत रावत (36) असे पीडितेचे नाव असून तो जिल्ह्यातील करौंडी गावचा रहिवासी आहे.

एएसपी पटले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'आम्ही आरोपीला (प्रवेश शुक्ला) ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई लवकरच केली जाईल. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 294, 504 आणि एससी/एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे'. (हेही वाचा, भाजप नेता Pravesh Shukla याने आदिवासी व्यक्तीवर केली लघवी? लज्जास्पद व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश (Watch Video))

व्हिडिओ

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी या घटनेबद्दल बोलताना सांगितले की, आरोपीचे कृत्य निंदनीय आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार मानवतेला काळीमा फासणाऱ्या आरोपीला काही झाले तरी सोडणार नाही. गुन्हेगाराला शिक्षा हा प्रत्येकासाठी नैतिकतेचा धडा बनेल. ते भोपाळ येथे बोलत होते. पुढे बोलताना चौहान म्हणाले, गुन्हेगाराला कोणताही धर्म, जात किंवा पक्ष नसतो. आरोपी हा आरोपीच असतो.

व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, आरोपींविरुद्ध जिल्ह्यातील बहारी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 294, 504, कलम 3(1) (आर)(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर एससी/एसटी कायदा आणि एनएसए देखील लागू करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करत ही अत्यंत निंदनीय घटना असल्याचे म्हटले आहे.