US Presidential Election 2024 मध्ये शर्यतीत Kamala Harris च्या यशासाठी भारतात Tamil Nadu मधील त्यांच्या गावात खास प्रार्थना, शुभेच्छांचा वर्षाव

Painganadu-Thulasendrapuram गावातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

Kamala Harris | X

US Presidential Election 2024 मध्ये जो बायडन यांनी माघार घेतल्यानंतर Democratic कडून Kamala Harris यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. कमला हॅरिसच्या यशासाठी आता भारतामध्येही प्रार्थना सुरू झाल्या आहे. तामिळनाडू मधील त्यांच्या मूळ गावी कमला हॅरिस यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स झळकले आहेत तसेच Dharma Sastha Temple मध्ये खास प्रार्थना करण्यात आली आहे. Painganadu-Thulasendrapuram गावातील नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

कमला हॅरिस यांचे आजोबा तामिळनाडू मधील Painganadu-Thulasendrapuram गावातील होते. 5 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी कमला हॅरिस अधिकृतपणे अर्ज सादर करेपर्यंत ही प्रार्थना सुरू राहणार आहे.

कमला हॅरिस या अमेरिकेत California च्या Oakland मध्ये मोठ्या झाल्या आहे. त्या भारतीय वंशाच्या पहिल्या US senator होत्या. हॅरिस यांनी यूएस 2024 ची निवडणूक जिंकल्यास अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला आणि दुसरी आफ्रिकन-अमेरिकन ठरतील.

चेन्नईपासून 350 किमी अंतरावर असलेल्या तिरुवरूर जिल्ह्यातील गावात सोमवारी सकाळी 9:30 ते 10:00 दरम्यान एक खास पूजा आयोजित करण्यात आली होती. Shri Thanedar Supports Kamala Harris: श्री ठाणेदार यांचा कमला हॅरीस यांना पाठिंबा; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतून Joe Biden बाहेर .

कमला हॅरिस यांची आई श्यामला हॅरिस यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या होत्या. तिथे त्यांची डोनाल्ड हॅरिसशी भेट झाली आणि दोघांचे लग्न झाले.

2021 मध्ये जेव्हा हॅरिस युनायटेड स्टेट्सच्या उपाध्यक्षपदी निवडून येणारी पहिली महिला बनली, तेव्हा तिच्या वडिलोपार्जित गावातील लोकांनी मोठ्या उत्साहात हा क्षण साजरा केला. त्यांनी सामूहिक भोजनाचे कार्यक्रम केले, फटाके फोडले, घरासमोर रांगोळ्या काढल्या, पोस्टर्स लावले आणि ऐतिहासिक दिवस साजरा केला.

बिडेन आणि हॅरिस यांनी 2021 मध्ये यूएसचे 46 वे राष्ट्राध्यक्ष आणि 49 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यांचे पती डग एमहॉफ यांनीही त्यांच्या पाठीशी राहून अमेरिकेचे पहिले Second Gentleman बनून इतिहास रचला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif