Porn Videos on Railway Station: पॉर्न व्हिडिओज डाउनलोड करण्यासाठी होत आहे रेल्वे स्थानकांवरील मोफत वाय-फाय सेवेचा वापर; Secunderabad स्टेशन अव्वल

त्यांच्या गेटवे डेटावरून असे दिसून आले आहे की, सर्च आणि डाउनलोड कंटेंटमध्ये पॉर्न कंटेंटचे प्रमाण जास्त आहे

Image For Representation (Photo Credit: File Photo))

हे डिजिटल क्रांतीचे युग आहे. बहुतेक लोक त्यांचे पेमेंट व्यवहार, महत्वाची बिले भरणे, तिकीट बुकिंग आणि इतर अनेक गोष्टी फोनवरच करतात. म्हणूनच काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वेने (Indian Railways) एक मोठे पाऊल उचलत देशातील अनेक प्रमुख स्थानकांवर वायफाय ( Wifi) सुविधा देण्यास सुरुवात केली होती. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. देशभरातील सुमारे 6100 रेल्वे स्थानकांवर प्रवासी मोफत हाय-स्पीड वाय-फाय वापरू शकतात. रेल्वेच्या वेळा, ऑनलाइन बुकिंग इत्यादी पाहण्यासाठी लोक याचा वापर करतील, असे रेल्वेला वाटले होते, मात्र या वायफायचा वापर नक्की कशासाठी होत आहे याबाबतचा जो अहवाल समोर आला आहे तो आश्चर्यकारक आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रेल्वे स्थानकावर देण्यात आलेल्या वायफाय सुविधेचा गैरवापर होत आहे. बहुतांश प्रवासी मोफत वायफायचा वापर अश्लील कंटेंट पाहण्यासाठी किंवा ते डाउनलोड करण्यासाठी करत असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सिकंदराबाद (Secunderabad) स्थानक पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे दक्षिण मध्य रेल्वेने (SCR) सर्वाधिक पॉर्न व्हिडिओ (Porn Videos) डाउनलोड केले आहेत. सिकंदराबाद नंतर, हैदराबाद, विजयवाडा आणि तिरुपती स्थानकावर अशी प्रकरणे सर्वात जास्त दिसली आहेत.

RailWire चालवणाऱ्या RailTel च्या सूत्रांनुसार, सिकंदराबाद आणि विजयवाडामधील 35% डाउनलोड हे पॉर्न कंटेंटचे आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सर्व विभागांची आकडेवारी पाहिली असता, त्यात युट्युब डाऊनलोड आणि इतर डाउनलोडमध्ये सर्वाधिक अश्लील कंटेंट आढळून आला. SCR ने 588 स्थानकांवर हाय-स्पीड वायफाय सेवा देण्याची योजना आखली होती, परंतु विद्यमान नेटवर्कच्या मंद बँडविड्थमुळे ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. त्यामागचे कारण पॉर्नोग्राफिक कंटेंट डाऊनलोड करणे हे सांगितले जात आहे. (हेही वाचा: रेल्वे प्रवाशांना त्यांच्या डेस्टिनेशन स्टेशन पूर्वी 'अलर्ट' करणारी रेल्वेची सेवा नेमकी सेट कशी करायची?)

या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, दररोज 12 लाखांहून अधिक वापरकर्ते RailWire वापरतात. त्यांच्या गेटवे डेटावरून असे दिसून आले आहे की, सर्च आणि डाउनलोड कंटेंटमध्ये पॉर्न कंटेंटचे प्रमाण जास्त आहे. भारत सरकारने अनेक पोर्नोग्राफिक वेबसाइट्सवर बंदी घातली असली तरी, लोक ते एक्सेस करण्यासाठी व्हिपीएन (VPN) वापरत आहेत. RailTel 30 मिनिटांसाठी हायस्पीड इंटरनेट सुविधा देत आहे, मात्र त्याचा गैरवापर चिंतेचा विषय आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif