IPL Auction 2025 Live

Delhi Assembly Election 2020: दिल्ली विधानसभा निवडणुकीत निर्भयाच्या आईला रिंगणात उभे करण्याच्या योजना; तिकीट देण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ

दिल्ली विधानसभा निवडणुकीत निर्भयाच्या आईला तिकिट देऊन मैदानात उतरवण्याच्या योजना आखल्या जात आहेत.

Nirbhaya's mother Asha Devi. (Photo Credits: ANI)

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Assembly Election 2020) बिगुल वाजले आहे. राजकीय पक्ष पुन्हा एकमेकांशी भिडण्यास तयार होत आहेत. मात्र आता यामध्ये अजून एका गोष्टीची चढाओढ लागली आहे. निर्भया प्रकरणामध्ये (Delhi Nirbhaya Case) आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तब्बल सात वर्षानंतर न्यायालयाचा हा निकाल. या सात वर्षांमध्ये आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून निर्भयाच्या आईने नेटाने प्रयत्न केले. आता अनेक राजकीय पक्ष निर्भयाच्या आईवर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत निर्भयाच्या आईला तिकिट देऊन मैदानात उतरवण्याच्या योजना आखल्या जात आहेत.

या विधानसभा निवडणुकीत निर्भयाची आई विजयी उमेदवार म्हणून सिद्ध होऊ शकते, याची जाणीव सर्व राजकीय पक्षांना आहे. म्हणूनच, आतल्या आता राजकीय पक्षांना या संधीचे भांडवल करायचे आहे. मात्र अजूनतरी कोणत्याही राजकीय पक्षांनी याबाबत उघडपणे बोलणी केली नाहीत. याबाबत निर्भयाच्या आईचे म्हणणे आहे की, तिचा पहिला हेतू तिच्या मुलीच्या मारेकऱ्यांना फासावर लटकलेले पाहणे हे आहे, त्यानंतर निवडणुका लढविण्याचा विचार केला जाईल. (हेही वाचा: निर्भया प्रकरण: फाशीच्या शिक्षेमुळे चारही आरोपी डिप्रेशनमध्ये; जेवण झालं कमी!)

समाजात संघर्ष करणार्‍या स्त्रीमध्ये, आपल्या मुलीसाठी एवढा कठोर संघर्ष करणार्‍या निर्भयाच्या आईपेक्षा अधिक चांगले उदाहरण काय असू शकते, असा युक्तिवाद भाजपा आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केला. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्ष निर्भयाच्या आईशी याबाबत बोलून तिला निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपा, कॉंग्रेस आणि आपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, निर्भयाच्या आईने निवडणुकीसाठी होकार दिला तर ती केवळ विजयी उमेदवार ठरणार नाही, तर दिल्लीच्या अनेक जागांवर आपल्या पक्षासाठी चांगला सकारात्मक प्रभाव पाडू शकेल. मात्र याबाबत तरी निर्भयाच्या आईने आपण कोणताही विचार केला नसल्याचे सांगितले आहे.