PMC Job Vacancy: पुणे महानगरपालिकेमध्ये नोकरभरतीची संधी; 17 सप्टेंबर पूर्वी असा करा अर्ज
पुणे महानगरपालिकेने आरोग्य विभागात बालरोग तज्ञ आणि नवजात शिशू तज्ञ या पदांसाठी ही नोकरभरती आहे.
पुणे महानगरपालिकेच्या (PMC) प्रशासकीय विभागामध्ये नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 10 जागा भरल्या जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेने आरोग्य विभागात बालरोग तज्ञ आणि नवजात शिशू तज्ञ या पदांसाठी ही नोकरभरती आहे. या पदांसाठी उमेदवारांना 17 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयात किंवा अधिकृत ईमेलवर अर्ज करण्यात येणार आहे.
बालरोगतज्ञासाठी दरमहा 1,20,000 रूपये तर नवजात अर्भक तज्ञ यांच्यासाठी 1,50,000 रूपये मानधन मिळणार आहे. बालरोगतज्ञ या पदासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र) किंवा एमबीबीएस, डिसीएच व डिसीएच नंतरचा बालरोगशास्त्र विषयातील किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. (नक्की वाचा: Nagpur Metro Recruitment 2021: नागपूर मेट्रो मध्ये इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी; येथे करा अर्ज).
नवजात अर्भक तज्ञ या पदासाठी इच्छुक उमेदवार डी.एस ( निओनाटॉलॉजी) किंवा एमडी पेडियाट्रीक्स किंवा त्यानंतरचा निओनाटॉलॉजी विषयाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. इथे पहा सविस्तर पदभरतीची नोटीस.
दरम्यान कोरोना संकटकाळामध्ये सरकार कडून अनेक कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. त्यासाठी देखील अनेक अनुभवी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना राज्य सरकारने आवाहन केले आहे. सध्या या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरभरती केल्या जात आहेत.