नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंची आदरांजली; केले हे खास ट्वीट

श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo) यांचे काल (17 डिसेंबर) वृद्धपकाळामुळे निधन झाले.

RIP Dr Shreeram Lagoo | Photo Credits: File Photo

मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo) यांचे काल (17 डिसेंबर) वृद्धपकाळामुळे निधन झाले. डॉ. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये डॉ. लागू यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 92 वर्षांचे होते. अभिनयासोबत सामाजिक भान जपणारे, अंधश्रद्धेविरूद्ध समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. डॉ. लागू यांच्या निधनाचे वृत्त समजताच कलाकार मंडळींसोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनीदेखील आपली श्रद्धांजली ट्वीटरच्या माध्यमातून अर्पण केली आहे. जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाची हळहळ व्यक्त करणारे राज ठाकरे यांचे ट्वीट.

डॉ. श्रीराम लागूंनी मागील अनेक वर्ष आपल्या अभिनयाने रसिकांसाठी दर्जेदार कलाकृती सादर केल्या आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. डॉ. लागूंवर प्रेम करणार्‍या रसिकांच्या, कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याच्या आशयाचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट

डॉ. श्रीराम लागू यांना अभिनय कारकीर्दीतील 'नटसम्राट' हे नाटक, 'सिंहासन', 'पिंजरा' यांसारखे मराठी सिनेमे मैलाचा दगड ठरले आहेत. डॉ.श्रीराम लागू यांनी सुमारे 4 दशकं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. त्यांनी 100 हून अधिक हिंदी सिनेमात आणि 40 पेक्षा अधिक मराठी सिनेमांमध्ये काम केले आहे. यासोबतीने 20 हून अधिक मराठी नाटकांचं दिग्दर्शनही केलं. त्यांनी मराठी, हिंदीबरोबरच गुजराती रंगभूमीवरही काम केलं आहे. श्रीराम लागू यांनी वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरीचं शिक्षण घेतलं होतं. अभिनयासोबत परखड विचार मांडणारे विवेकवादी अभिनेते म्हणून डॉ. लागूंची ओळख होती.