Great Patriotic War Anniversary: महान देशभक्त युद्धाचा वर्धापन दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला भेट देण्याची शक्यता
India-Russia Relations: पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मे रोजी मॉस्कोच्या रेड स्क्वेअर येथे 80 व्या विजय दिन परेडसाठी रशियाला भेट देण्याची शक्यता आहे. जागतिक राजनैतिक चर्चेत भारतीय सैन्याच्या सहभागाचा समावेश असलेल्या या भेटीला महत्त्व आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM ) लवकरच रशिया (Russia Visit) दौऱ्यावर निघण्याची शक्यता आहे. खास करुन ते येत्या 9 मे रोजी मॉस्को येथील रेड स्क्वेअर येथे 80 व्या विजय दिन परेडला (Victory Day Parade) उपस्थित राहू शकतात. जी सोव्हिएत युनियनच्या महान देशभक्तीपर युद्धातील विजयाच्या (Great Patriotic War) वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली जाते. रशियन वृत्तसंस्था टास (TASS) ने याबाबत वृत्त दिले आहे. ग्रेट पेइट्रीऑटिक् वॉर विक्ट्री परेड (Great Patriotic War Victory Day Parade) हा शब्द आणि कार्यक्रम प्रामुख्याने सोव्हिएत युनियनच्या महान देशभक्तीपर युद्धातील विजयाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला जातो, आणि तो दुसऱ्या महायुद्धातील भूमिकेचे वर्णन करण्यासाठी रशियामध्ये वापरला जाणारा शब्द आहे.
संभाव्य दौऱ्याची आखणी?
लष्करी सूत्रांचा हवाला देत वृत्तसंस्था टासने दिलेल्या वृत्ताचा धागा पकडत वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया भेटीची शक्यता अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मे रोजी मॉस्को येथे होणाऱ्या परेडला उपस्थित राहण्याचा संभाव्य कार्यक्रम आखत आहेत. त्यामुळे त्यांचा रशिया दौरा होण्याची दाट शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. (हेही वाचा, The Eight Great Powers of 2025: जगातील 8 शक्तिशाली देशांच्या यादीत भारताला मिळाले 5 वे स्थान; ब्रिटन, फ्रान्सला टाकले मागे, See List)
विजय दिन परेडमध्ये भारतीय लष्कराचा सहभाग?
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात, म्हटले आहे की परेडमध्ये भारतीय सशस्त्र दलाच्या एका औपचारिक तुकडीच्या सहभागाबाबत चर्चा सुरू आहे. जर याची पुष्टी झाली तर, भारतीय तुकडी रिहर्सलसाठी किमान एक महिना आधी रशियात पोहोचावी लागेल. अधिकारी सध्या भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांच्या तैनातीसाठी रसद तयार करत आहेत.
विजय दिन समारंभाला जागतिक नेत्यांची उपस्थिती
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी अलीकडेच सांगितले की, मॉस्को समारंभात अनेक देशांनी त्यांच्या सहभागाची पुष्टी केली आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी असेही नमूद केले की कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेट्स (सीआयएस) आणि इतर राष्ट्रांमधील परदेशी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. विजय दिनाचे महत्त्व ओळखणाऱ्या सर्व परदेशी नेत्यांचे रशियन बाजू आनंदाने स्वागत करेल, पेस्कोव्ह पुढे म्हणाले.
जागतिक तणावाच्या काळात भारत-रशिया संबंध मजबूत?
युक्रेन संघर्षाबाबत अमेरिका आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांच्या दरम्यान पंतप्रधान मोदींचा संभाव्य दौरा महत्त्वाचा ठरतो. दोन्ही देशांमधील शांतता चर्चेचा पहिला टप्पा अलीकडेच सौदी अरेबियातील रियाध येथे पार पडला. रशिया-युक्रेन युद्धावर भारताने तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे, संवाद आणि शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या त्यांच्या मागील भेटींमध्ये, मोदींनी शांततापूर्ण तोडग्याच्या गरजेवर भर दिला आहे.
अलिकडच्या वर्षांत पंतप्रधान मोदींचा हा दुसरा रशिया दौरा असेल. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी राष्ट्रपती पुतिन यांच्या निमंत्रणावरून काझान येथे झालेल्या 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत भाग घेतला होता. आगामी दौऱ्यामुळे भारत-रशिया संबंध अधिक मजबूत होतील, विशेषतः संरक्षण, व्यापार आणि राजनैतिक सहकार्यात, अशी चर्चा आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)