PM Narendra Modi On BJP Win: आजच्या विजयाने 2024 च्या हॅटट्रीकची गँरटी दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींने फुंकले लोकसभा निवडणूकाचे रणशिंग

पण मी सातत्याने सांगत होतो की माझ्यासाठी देशात फक्त चार जाती आहेत. त्या म्हणजे नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि जवान. या चार जातींना सशक्त केलं तरच देश सशक्त होईल.

तीन राज्यांच्या निवडणुकाचे निकाल समोर आल्यानंतर लोकांचे आभार व्यक्त करण्यासाठी भाजपने सभा आयोजित केली आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उपस्थितांना संबोधित केलं. आजचा विजय ऐतिहासिक असून सबका साथ सबका विकास या भावनेचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली. आज भारताच्या विकासाठी राज्यांचा विकास झाला पाहिजे या विचाराचा विजय झाला असल्याचं देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. भाजपनं दिलेलं आश्वसन पूर्ण करण्याची गॅरंटी देतो. गॅरंटी पूर्ण करण्याचीही गॅरंटी देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला वचन दिलं. यावेळी मोदी यांनी 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणूकाचे रणशिंग देखील फुंकले. आजचा विजय हा 2024 च्या हॅटट्रीकची गँरटी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. (हेही वाचा - PM Narendra Modi On BJP Win: आजचा विजय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, आत्मनिर्भर भारतचा हा विजय - पंतप्रधान नरेंद्र मोदी)

या निवडणुकांमध्ये सर्वांना जातींमध्ये वाटण्याचे  प्रयत्न झाले. पण मी सातत्याने सांगत होतो की माझ्यासाठी देशात फक्त चार जाती आहेत. त्या म्हणजे नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि जवान. या चार जातींना सशक्त केलं तरच देश सशक्त होईल. आज प्रत्येक जातीचा माणून सांगतोय, की हा आमचा विजय आहे.  असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा विजय आहे. त्यामुळे तुम्ही जी साथ आम्हाला दिली त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. मी तुम्हाला वचन देतो की विकासाची सगळी वचनं पूर्ण होतील आणि एका नव्या भारताची निर्मिती होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांचा सुपडा साफ झालाय. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड यांसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झालीये, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आघाडीला घमंडिया आघाडी असा उल्लेख केला. तसेच या विजयानंतर देशविरोधी ताकद पुन्हा एकत्र येऊन देशविरोधी कारवाई करण्यासाठी जोर लावतील यांना एकत्र येऊन तोंड देण्यासाठी सर्वांनी एकजूट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.