PM Modi Speech: नरेंद्र मोदी यांची चेहरा कव्हर करण्यासाठी 'गमछा' स्टाईल; घरगुती मास्क वापरण्याचा सल्ला देताना मोदींचा हटके फंडा
या भाषणासोबतच आजचा मोदींचा लुक सुद्धा सोशल मीडियावर बराच गाजत आहे. मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला गमछा (Gamcha) ने आपला चेहरा कव्हर केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशवासीयांशी संवाद साधला, यावेळी मोदींनी लॉकडाउनच्या (Lockdown) अवधीत 3 मे पर्यंत वाढ करण्यापासून ते लॉक डाऊन काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत प्लॅन पर्यंत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. या भाषणासोबतच आजचा मोदींचा लुक सुद्धा सोशल मीडियावर बराच गाजत आहे. मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला गमछा (Gamcha) ने आपला चेहरा कव्हर केला होता. कोरोनाशी लढा देण्यासाठी घरगुती मास्कचा (Homemade Mask) वापर केल्यासही मदत होऊ शकते असे सांगण्यासाठी मोदींनी हा फंडा वापरला असल्याचे म्हंटले जातेय. यासाठी पांढऱ्या रंगाचे कापड आणि त्यावर लाल रंगात डिझाईन अशा सध्या रूपात असणारा हा पारंपरिक बेसिक गमछा मोदींनी निवडला होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषांतील महत्वाचे मुद्दे जाणून घ्या.
नरेंद्र मोदींनी आजच्या भाषणाला सुरुवात करण्याआधी हा गमछा घालून आपले तोंड कव्हर केले होते , त्यातच नमस्कार करत मग त्यांनी आपल्या चेहऱ्यावरून गमछा हटवला. यापूर्वीही सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असताना सुद्धा त्यांनी असाच मास्क वापरला होता. तसेच अनेकदा त्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी घरगुती मास्क वापरा असे आवाहन केले होते. मोदींनी हे आवाहन करताच देशातील अनेकांनी गमछासोबत फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केले होते. Lockdown Extended: लॉकडाउन काळात कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला 7 नियमांचा हा मास्टरप्लॅन; जाणून घ्या सविस्तर
दरम्यान, भारतात आज कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 10,363 वर जाऊन पोहोचली आहे. यात 8988 सक्रिय केसेस, 1035 डिस्चार्ज मिळालेले रुग्ण तसेच 339 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. अशावेळी प्रत्येकाने आपली काळजी घेणे आणि घरी राहणे गरजेचे आहे.