PM Narendra Modi: 'फक्त पाच कोटी द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार करतो' सोशल मिडियावर पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीस Puducherry येथून अटक
त्यात म्हटले आहे की, जर कोणी त्याला पाच कोटी रुपये दिले तर तो पंतप्रधानांना मारण्यासाठी तयार आहे. गुरुवारी एका कार चालकाने हा मेसेज पाहून पोलिसांना कळवले
पुडुचेरी (Puducherry) येथे पोलिसांनी 43 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना ठार मारण्याचा प्रस्ताव दिला होता. आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयातही हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. असे सांगितले जात आहे की, या व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिले होते की, जर कोणी त्याला पाच कोटी रुपये दिले तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करेल. आरोपी सत्यानंदम हा पुडुचेरी येथील आर्यंकुप्पम गावचा रहिवासी असून तो रिअल इस्टेट व्यावसायिक आहे.
UNI India ने याबाबत वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फेसबुकवर एक मेसेज लिहिला. त्यात म्हटले आहे की, जर कोणी त्याला पाच कोटी रुपये दिले तर तो पंतप्रधानांना मारण्यासाठी तयार आहे. गुरुवारी एका कार चालकाने हा मेसेज पाहून पोलिसांना कळवले, त्यानंतर आरोपीला 4 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्याच्याविरूद्ध कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. (हेही वाचा: कोविड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्च महिन्यात सुरु होण्याची शक्यता- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन)
दरम्यान, याआधी सप्टेंबर 2020 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येविषयी एक मोठे षडयंत्र समोर आले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेला काही धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाले होते, ज्यामध्ये पंतप्रधान मोदींची हत्या असल्याचे सांगितले गेले आहे. या ईमेलमध्ये फक्त 3 शब्द वापरले गेले आहेत, ते म्हणजे ‘किल नरेंद्र मोदी’. 8 ऑगस्ट रोजी हा ई-मेल प्रसिद्ध झाला होता, ज्यामध्ये पंतप्रधानांच्या जीवाला थेट धोका असल्याचे प्रकरण समोर आले.