ISRO चीफ के. सिवन यांना अश्रू अनावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिठी मारत दिला धीर (Watch Video)
नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात पडून सीवन यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
चांद्रयान 2 (Chandrayaan 2 )ही भारतीय आणि इस्त्रोसाठी एक मोठी चंद्रमोहिम होती. चांद्रयान 2 चे विक्रम लॅंन्डर 7 सप्टेंबरच्या मध्यरात्री चंद्रावर उतरणं अपेक्षित होते. मात्र अवघ्या 2.1 किमी दूर त्याच्याशी संपर्क तुटला अन इस्त्रो शास्त्रज्ञ सह भारतीयांचा हिरमोड झाला. काल मध्यरात्री शाळकरी विद्यार्थ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील हा सोहळा पाहण्यासाठी इस्त्रोच्या कार्यालयात पोहचले होते. मात्र संपर्क तुटल्याची माहिती मिळताच सार्यांच्याच उत्साह मावळला. के सीवन (ISRO Chief K Sivan) यांनी संपर्क तुटल्याची माहिती दिली. तसेच पुन्हा संपर्क होतोय का? यासाठी प्रयत्न सुरू असल्याची महिती देण्यात आली. मात्र सरेच प्रयत्न निष्कळ ठरत असल्याचं पाहुन अनेकांच्या चेहर्यावर निराशेची भावना होती. आज (7 सप्टेंबर ) दिवशी नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या संशोधकांसह भारतीयांना उद्देशून खास संदेश देताना विज्ञानात प्रयोग असतो अपयश नाही असे सांगत पुन्हा दमाने प्रयत्नाला लागा असा सल्ला दिला यावेळेस इस्त्रो कार्यालयातून मोदी बाहेर पडताना इस्त्रो अध्यक्ष के सीवन यांना अश्रू अनावर झाले. नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात पडून सीवन यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
के सीवन यांच्यासह अनेक शास्त्रज्ञ मागील काही महिने अहोरात्र काम करत आहेत. या गोष्टीची मला जाणीव आहे असेमोदींनी म्हटले. तसेच अगदी अंतिम पावलावर चंद्रमोहिमेत अपयश आलं असलं तरीही या अनुभवाचा आपल्याला फायदाच होईल असं म्हणत त्यांनी शस्त्रज्ञांच्या प्रयत्नांचं कौतुक करत त्यांना धीर दिला. ISRO च्या चांद्रयान 2 मोहिमेच्या प्रयत्नांच्या पाठीशी भारतीय; लालबागचा राजा गणेशमंडळाकडूनही देखाव्यामध्ये बदल करत अभिमानास्पद कामगिरीचं कौतुक
इस्त्रो अध्यक्ष के सीवन यांना अश्रू अनावर
चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार होते. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे. चंद्रयान मोहिमेमध्ये 13 पेलोड आणि 8 ऑर्बिट, 3 लॅन्डर आणि दोन रोव्हर होते. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLV MK III)या प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण झाले. भारताची ही चांद्र मोहीम यशस्वी झाली असती तर भारत हा अमेरिका ,चीन, व रशिया पाठोपाठ चंद्रावर उतरणारा जगातील चौथा देश ठरला असता.