नरेंद्र मोदींनी दुर्गाअष्टमीनिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा ; अन्याय दूर करण्यासाठी प्रार्थना

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुर्गाअष्टमीनिमित्त देशबांधवांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदींनी केली दुर्गापूजा ( Photo Credit: twitter )

नवरात्रोत्सवातील आज अष्टमीचा दिवस. दुर्गाअष्टमीचा सोहळा देशभरात साजरा केला जातो. त्यात देशाचे पंतप्रधान मोदीही सहभागी झाले आहेत.  मोदींनी दुर्गाअष्टमीनिमित्त देशबांधवांना शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा देताना मोदींनी ट्विटमध्ये लिहिले की, "सर्वांना दुर्गाअष्टमीच्या शुभेच्छा. देवी दुर्वेच्या आशीर्वादाने आपल्या समाजात आनंद आणि शांती नांदू दे आणि सर्व प्रकारचे अन्याय दूर होऊ दे."

देवी दुर्गेचा उत्सव देशभरात साजरा केला जात आहे. आकर्षक आणि भव्य मंडळ सजले आहेत. संपूर्ण देश देवीच्या भक्तीत तल्लीन झाला आहे.

नवरात्रीच्या पवित्र काळात दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. त्यानंतर दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाते. विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावरचा, चांगल्याचा वाईटावरील विजयाचे प्रतिक आहे. ...म्हणून साजरा केला जातो दसरा