Rahul Gandhi यांचा Narendra Modi यांच्यावर पुन्हा हल्लाबोल; पूर्व लद्दाख मध्ये पंतप्रधानांनी चीन ला भारताची जमीन दिल्याचा दावा
फिंगर 4 हे देखील आपलं क्षेत्र आहे. पण तरीसुद्धा फिंगर 4 वरून फिंगर 3 मध्ये सैनिक का ठेवण्यात आले? पंतप्रधानांनी आपली जमीन चीनला देऊन टाकली का? याचं उत्तर मोदींनी देशवासियांना द्यावं असे देखील राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.
पूर्व लद्दाखच्या स्थितीवर काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनंतर आज कॉंग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरकार वर वर मोठा हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र डागताना सरकारने भारतभूमीचा हक्काचा जमीनीचा काही तुकडा चीनला (China) देऊन मोदी चीनसमोर झुकल्याचा आरोप केला आहे. सोबतच त्यांच्यामध्ये चीन समोर उभं राहण्याचं धैर्य नसल्याचंदेखील म्हटलं आहे. India- China Border Dispute: भारत-चीन सीमावाद निवळण्याची चिन्हे, पैंगोंग लेक येथून दोन्ही देशांचे सैन्यदल मागे हटले- राजनाथ सिंह.
भारत सरकरची नेगोशिएटिंग पोजिशन अशी होती की एप्रिल 2020 मध्ये जी स्थिती होती तिच पुन्हा द्यावी पण आपले सैनिक आता कैलाश पर्वतरांगांमध्ये फिंगर 3 मध्ये तैनात केले जातात. फिंगर 4 हे देखील आपलं क्षेत्र आहे. पण तरीसुद्धा फिंगर 4 वरून फिंगर 3 मध्ये सैनिक का ठेवण्यात आले? पंतप्रधानांनी आपली जमीन चीनला देऊन टाकली का? याचं उत्तर मोदींनी देशवासियांना द्यावं असे देखील राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची जमीन चीनला दिली हे सत्य असल्याचा दावा केला आहे. सरकाराने त्यांच्यासमोर झुकती बाजू घेतली आहे. ज्या रणनितीक क्षेत्रामध्ये चीनने घुसखोरी केली आहे त्याभागाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काहीच का उत्तर देत नाहीत.
मागील काही महिन्यांमध्ये भारत-चीन सैन्यांमध्ये सीमाभागांत तणाव असल्याचं पहायला मिळालं आहे. हिंसक झडपी दरम्यान भारतीय सैनिक जखमी झाल्याचंदेखील बघायला मिळालं होतं. त्यावेळेस पंतप्रधानांनी स्वतः सीमेवरील सैन्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांची भेट घेतली होती.
पूर्व लडाख सीमेवर मागील 9 महिन्यांच्या तणावाग्रस्त स्थिती होती. मात्र कालपासून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन भारत आणि चीनने सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक रणगाडे आणि सैन्य देखील दोन्हीकडून हटवले जात आहे.