Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' या कार्यक्रमातून आज देशवासियांशी साधणार संवाद
आज सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
संपूर्ण देशवासियांना महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ज्या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिलेली असते तो रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' (Mann ki Baat) आज होणार आहे. संपूर्ण देश कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या विळख्यात अडकत चालला असला तरी सर्व कोविड योद्धा (COVID Warriors), प्रशासनासह सर्व देशवासिय या विषाणू विरोधात एक मोठा लढा लढत आहे. 31 जुलै पर्यंत देशातील अनेक राज्यांत लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनचा हा पाचवा टप्पा 31 जुलै ला संपणार असून यापुढे सरकारची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
आजच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील कोरोनाचे संकट, नैसर्गिक आपत्ती या सर्वांवर काही भाष्य करणार का याकडे देखील सर्व जनता कान लावून बसली आहे. काही दिवसांपूर्वी मोदींनी एक ट्विट केले होते. ज्यात ते म्हणाले होते की, "मला विश्वास आहे की तुम्हाला याबाबत माहिती असेल. जेणेकरुन एकजूट होऊन केलेले प्रयत्न हे प्रेरणादायक आणि सकारत्मक ठरले आहेत. असे पैलु तुम्हाला माहिती असतील ज्यामुळे अनेक जणांचे आयुष्य बदलले आहे. तर येत्या 26 जुलैला असणाऱ्या मन की बात मध्ये त्यांना समोर घेऊन या असे आवाहन मोदी यांनी केले आहे." यामुळे आजच्या कार्यक्रमातून या लोकांशी मोदी बातचीत करतील असेही दिसतय.
हेदेखील वाचा- Maan Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला 'मन की बात' च्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद
यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जून महिन्याच्या 28 तारखेला मन की बातच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी मोदी यांनी चीन संदर्भात विविध विषयांबाबत सांगितले होते. पीएम मोदी यांनी त्यावेळी असे ही म्हटले की, भारताकडे नजरवर करुन पाहणाऱ्यांना जशासतशे उत्तर मिळाले आहे. जर भारत मैत्री टिकवणे जाणतो त्याचप्रमाणे डोळ्यात डोळे घालून उत्तर देणे ही भारताला येते असेही ते म्हणाले होते.