Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी साधणार संवाद

हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या देशाला या संकटाशी धैर्याने लढण्यासाठी बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही मह्त्त्वाच्या गोष्टी सांगण्याची अपेक्षा आहे.

Narendra Modi | (Photo Credits:pmindia.gov)

कोरोना व्हायरससारखी (Coronavirus) महामारी, देशाची आर्थिक परिस्थिती, लॉकडाऊनमुळे (Lockdown) आलेली बेरोजगारी यांसारख्या अनेक संकटाच्या विळख्यात अडकलेल्या देशवासियांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमाद्वारे भेटीला येणार आहे. आज सकाळी 11 वाजता देशाला संबोधित करत देशवासियांशी संवाद साधतील. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी संपूर्ण देशवासिय या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. या रेडिओ कार्यक्रमाद्वारे ते गेली कित्येक वर्षे देशवासियांशी संवाद साधत आहे. आज या कार्यक्रमाचा 68 वा भाग प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात देशाची सद्य परिस्थिती, लॉकडाऊन, अनलॉक, आर्थिक परिस्थिती या सर्वांवर भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच हा लॉकडाऊनचा सहावा टप्पा सुरु असून याबाबत काय महत्त्वाची घोषणा करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोना व्हायरसशी लढत असलेल्या देशवासियांना धीर देण्यासाठी पंतप्रधान मोदी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या देशाला या संकटाशी धैर्याने लढण्यासाठी बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही मह्त्त्वाच्या गोष्टी सांगण्याची अपेक्षा आहे. Mann Ki Baat on July 26: कोरोना व्हायरस संकटाचा धोका अद्यापही कायम; डॉक्टर, नर्स यांच्याकडून प्रेरणा घ्या- पंतप्रधान मोदी

मागील महिन्यात 26 जुलैला झालेल्या मन की बात या कार्यक्रमातून चेहऱ्यावर मास्क, साबणाने हात धुणे, व्यक्तिगत स्वच्छता राखणे, सुरक्षित अंतर ठेवणे इतकेच नव्हे तर देशातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगणे, उघड्यावरती न थुंकणे यांसारख्या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. कोरोना व्हायरसपासून लढण्यासाठी सुरक्षितता हेच आपले शस्त्र आहे, असेही ते म्हणाले.