पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' मधून साधणार जनतेशी संवाद, त्यासाठी काय कराल?
कोरोनाविरुद्ध सुरु असलेली देशाची लढाई जिंकण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबाबत नरेंद्र मोदी मार्गदर्शनही करतील.
कोरोना व्हायरस सारख्या महाभयाण विषाणूने संपूर्ण जगभरात हाहाकार माजविला असून भारतातही या विषाणूविरुद्ध जोरदार लढा सुरु आहे. यासाठी भारत सरकार सह संपूर्ण शासकीय, वैद्यकीय यंत्रणा तसेच जनताही सहभागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सकाळी 11 वाजता 'मन की बात' या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहे. कोरोनाविरुद्ध सुरु असलेली देशाची लढाई जिंकण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबाबत नरेंद्र मोदी मार्गदर्शनही करतील.
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत ठेवण्यात आलेला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला. याबाबत लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे उत्तर या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान देतील. Coronavirus In India: भारतात कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 24,942 वर; गेल्या 24 तासांत 1490 रुग्णांची नोंद
त्यासाठी काय कराल?
आपले मत नोंदवण्याकरिता जनतेला 1800-11-7800 करुन दिला आहे. याव्यतिरिक्त नागरिक MyGov आणि NaMo ऍपद्वारे आपले मत नोंदवू शकतात.
भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 24,942 वर गेली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 मुळे 779 मृत्यूमुखी पडले आहेत आणि, तर एकूण 18,953 सक्रिय रुग्ण आहेत. शिवाय, कोरोनाची 1490 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर या विषाणूमुळे 56 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे संक्रमित 249 लोक बरे झाले आहेत.