Coronavirus: कोरोना व्हायरस संकटाच्या उपाययोजनांबद्दल WHO कडून भारताचे कौतुक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अशी आज्ञाधारकपणा व सेवेच्या भावनेने जनता त्याचे पालन करेल याची कोणी कल्पनाही केली नसती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचा (BJP) आज 40 वा स्थापना दिवस आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्य माध्यमातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना ते म्हणाले, कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुदधचे युदध आपल्याला न थकता जिंकायचे आहे. हे एक प्रदीर्घ काळ चालणारे युद्ध आहे. त्यासाठी संयमाने लढावे लागणार आहे, असेही मोदी म्हणाले. या वेळी मोदी यांनी कोरोना व्हायरस संकटाबाबत केंद्र सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली आणि कौतुकही केले. दरम्यान, देश सध्या कठीण काळातून जात आहे. या काळात सोशल डिस्टंन्सीग अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचे पालन करावे असेही मोदी यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, 6 एप्रिल 1980 या दिवशी भारतीय जनता पत्राची स्थापना करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काय म्हणाले?
-
- भारतासारख्या मोठ्या देशात लॉकडाऊन दरम्यान लोकांनी दाखविलेले परिपक्वता अभूतपूर्व आहे. अशी आज्ञाधारकपणा व सेवेच्या भावनेने जनता त्याचे पालन करेल याची कोणी कल्पनाही केली नसती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
एएनआय ट्विट
-
- भाजपाचा स्थापना दिवस अशा वेळी आला आहे जेव्हा केवळ देशच नाही तर जगही कठीण काळातून जात आहे. मानवतेला एक संकटाचा सामना करावा लागत आहे, देशाच्या सेवेबद्दलची आपली भक्ती या आव्हानात्मक काळात आपला मार्ग निर्माण करते: पंतप्रधान नरेंद्र मोदी
एएनआय ट्विट
- भारताने समग्र पध्दतीने वेगाने काम केले आहे. ज्याचे कौतुक फक्त भारतीयच नाही तर डब्ल्यूएचओकडून देखील केले जात आहे. सर्व देशांनी एकत्र यावे आणि या संघर्षाने संघर्ष करावा, म्हणून सार्क देशांच्या बैठकीत आणि जी -20 बैठकीत भारताचा सक्रीय सहभाग होता.
एएनआय ट्विट
- कोरना व्हायरसच्या संकटाचा सामना करताना भारताच्या प्रयत्नांनी जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. भारत हा अशा देशांपैकी एक आहे ज्याने या आजाराचे गांभीर्य समजले आणि त्याविरुद्ध वेळेवर युद्ध केले. भारताने अनेक निर्णय घेतले आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. (हेही वाचा, Coronavirus: कोरोना व्हायरस संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्राने राज्यांना आर्थिक पॅकेज देणे आवश्यक - शरद पवार)
दरम्यान, आम्ही काल रात्री 9 वाजता आपल्या देशातील 130 कोटी लोकांच्या एकात्मतेचा अनुभव घेतला. समाज आणि वयोगटातील प्रत्येक व्यक्तीने हे ऐक्य दाखवून कोविड COVID-19 च्या विरोधातील लढा दृढ केला, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.