PM Modi Reacts On 'Poisonous Snake' Remark: कॉंग्रेसच्या टीकेला नरेंद्र मोदी यांचे प्रत्युत्तर; ... तर मी साप व्हायला देखील तयार!

मोदींची विचारधारा विषारी सापासारखी आहे. तुम्ही ती चाटायला गेलात तर तुमचा मृत्यू निश्चित आहे अशा आशयाचं वक्तव्य मल्लिकार्जुन यांनी काही दिवसांपूर्वी प्रचारसभेत बोलताना केले होते.

PM Modi Reacts On 'Poisonous Snake' Remark: कॉंग्रेसच्या टीकेला नरेंद्र मोदी यांचे प्रत्युत्तर; ... तर मी साप व्हायला देखील तयार!
Narendra Modi in Karnataka| Twitter

कर्नाटक (Karnatak) मध्ये विधानसभा निवडणूकीचा प्रचार ऐन रंगात आला आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना 'विषारी साप' म्हणून केली होती. त्यानंतर आज प्रचाराच्या भाषणात बोलताना नरेंद्र मोदी यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. कोलार येथील प्रचारसभेतून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ' सध्या मी भ्रष्ट्राचाराला साफ करण्याचं काम करत आहे तर कॉंग्रेसचा माझ्याविरोधी राग अधिक वाढला आहे. आता कर्नाटकात प्रचारामध्ये 'साप आणि सापाचं विष' चा मुद्दा आणून त्यावर हे मत मागत आहेत' असं मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान विषारी साप ही मोदींना देण्यात उपमेचा देखील त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'जर हे मला साप म्हणत असतील तर तेही चालेल. कारण ईश्वररूपी जनतेच्या गळ्यातला साप होणं मला मंजूर आहे. जसा भगवान शंकराच्या गळ्यात साप होता तसा मी जनतेच्या गळ्यातला साप होईन. कर्नाटकमधील जनता शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसला 10 मे दिवशी मतपेटीतून उत्तर देईल.' असा विश्वास मोदींनी बोलून दाखवला आहे. Mallikarjun Kharge On Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांची टीका (Watch Video) .

पहा नरेंद्र मोदी यांचं प्रत्युत्तर

कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी 10 मे दिवशी मतदान आहे तर 13 मे दिवशी मतमोजणी आहे. 225 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 1985 नंतर म्हणजेच गेल्या 38 वर्षात सलग पाच वर्षांपेक्षा जास्त काळ कर्नाटकच्या मतदारांनी कोणत्याही पक्षाला कौल दिलेला नाही.

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2023 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).