PM Modi offered Glass of Water to Sharad Pawar: आधी खुर्ची धरली...मग ग्लास पाण्याने भरला; पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचा 'असा' केला मानसन्मान (Watch Video)

शरद पवार परिषदेत पोहोचले तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांचे आदराने स्वागत केले. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला असून नेटीझन्स मोदींचा शरद पवार यांच्याबद्दलचा आदर पाहून भारावून गेले आहेत.

PM Modi offered Glass of Water to Sharad Pawar (फोटो सौजन्य - PTI)

PM Modi offered Glass of Water to Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गुरुवारी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) उद्घाटन केले. या संमेलनाला पंतप्रधान मोदींसह शरद पवारही उपस्थित होते. शरद पवार (Sharad Pawar) परिषदेत पोहोचले तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांचे आदराने स्वागत केले. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला असून नेटीझन्स मोदींचा शरद पवार यांच्याबद्दलचा आदर पाहून भारावून गेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांची खूर्ची धरली...नंतर ग्लास पाण्याने भरला -

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर बसले होते. यावेळी शरद पवारही तिथे पोहोचले. शरद पवारांना पाहताच पंतप्रधान मोदी त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी शरद पवार यांना बसता यावं यासाठी खुर्ची पकडली. जेव्हा शरद पवार त्यांच्या खुर्चीवर बसले, तेव्हा पंतप्रधान मोदी त्यांच्या खुर्चीवर बसले. यानंतर, पंतप्रधान मोदींनी शरद पवारांसाठी ग्लासमध्ये पाणी भरले. पंतप्रधान मोदी यांच्या शरद पवारांबद्दलच्या आदर तिथ्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (हेही वाचा - 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: आजपासून दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु; PM Narendra Modi यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन)

पहा व्हिडिओ -  

एका मराठी भाषिक महापुरुषाने RSS चे बीज पेरले - पंतप्रधान मोदी

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज आपल्याला या गोष्टीचा अभिमान वाटेल की 100 वर्षांपूर्वी एका मराठी भाषिक महापुरुषाने महाराष्ट्राच्या भूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीज पेरले होते. आज ते त्याचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. गेल्या 100 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताची महान परंपरा आणि संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संस्कार यज्ञ राबवत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यासारख्या लाखो लोकांना देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली आहे. संघामुळेच मला मराठी भाषा आणि मराठी परंपरेशी जोडण्याचा मान मिळाला आहे.

दरम्यान, मराठी साहित्य संमेलनात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'मराठी भाषा अमृतापेक्षा गोड आहे. ते ही भाषा बोलण्याचा आणि मराठी भाषेतील नवीन शब्द शिकण्याचा सतत प्रयत्न करत असतात. आपली मुंबई केवळ महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी म्हणून उदयास आली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईनेच मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांनाही चालना दिली आहे. सध्या 'छावा' या नवीन चित्रपटाने धुमाकूळ घालत आहे.'

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now