PM Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, पाहा कोणाचा राजीनामा, कोणाला संधी? जुने चेहरे OUT नवे IN

हर्षवर्धन (Dr. Harshvardhan), शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक ( Ramesh Pokhriyal Nishank), कामगार मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) या कॅबिनेट तर संजय धोत्रे देबाश्री चौधरी आणि रतनलाल कटारिया या राज्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे.

PM Modi Cabinet Expansion | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

केंद्रीय मंत्रिमंडळात ( Cabinet Expansio) आज (7 जुलै) विस्तारासोबतच बरेच बदल आणि खांदेपालटही होत आहे. मोदी कॅबिनेटमधील काही जुन्या चेहऱ्यांना डच्चू दिला जात आहे तर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. राज्यमंत्री पदावर कार्यरत असलेल्या काही मंत्र्यांना कॅबिनेट पदावर बढतीही दिली जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारावेळी नवे जुणे असे सर्व मिळून 43 मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते. दरम्यान, आतापर्यंत जाहीरपणे पुढे आलेल्या माहितीनुसार आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan), शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक ( Ramesh Pokhriyal Nishank), कामगार मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) या कॅबिनेट तर संजय धोत्रे देबाश्री चौधरी आणि रतनलाल कटारिया या राज्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. जाणून घ्या कोणत्या मंत्र्यांना दिला राजीनामा. कोणाला मिळू शकते मंत्रिमंडळात संधी.

राजीनामा दिलेले कॅबिनेट मंत्री

राजीनामा दिलेले इतर मंत्री

केंद्रीय मंत्रिमंडळात बढती मिळू शकतील असे चेहरे

अनुराग ठाकुर, पुरुषोत्तम रुपाला. जी किशन रेड्डी, किरण रिजिजू, हरदीप सिंह पुरी, मानुष मा

मंत्रीपदाच्या चर्चेतील सर्वाधिक चर्चीत चेहले

ज्योतिरादित्य सिंधिया, सर्बानंद सोनोवाल, नारायण राणे, वरुण गांधी, मीनाक्षी लेखी

दरम्यान, पशुपति कुमार पारस (लोक जनशक्ति पार्टी) , आर.सी.पी. सिंह (जनता दल यूनायटेड), अनुप्रिया पटेल (अपना दल) आदी मंडळींचीही नावे चर्चेत आहेत. परंतू ही नावे एनडीएचे घटक पक्ष असलेल्यांपैकी आहेत. त्यामुळे भाजप एनडीएतील घटक पक्षांचा किती विचार करतो यावर या मंडळींना मंत्रीपद मिळू शकते किंवा नाही हे ठरणार आहे.