Plasma Therapy: अमेरिकेने दिल्ली Delhi Model अनुसरले; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा
देशात इतर कोणत्याही ठिकाणी प्लाज्मा थेरेपी वापरण्या आधी ती दिल्लीत वापरण्यात आली. इतकेच नव्हे तर जगातही दिल्लीमध्येच पहिल्यांदा प्लाज्मा थेरेपी ट्रायल करणयात आली. आतापर्यंत प्लाज्मा देऊन 900 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. '
दिल्ली (Delhi) येथे सुरु करण्यात आलेली प्लाज्मा थेरेपी (Plasma Therapy) अमेरिकेनेही (US) फॉलो केली आहे, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी केला आहे. दिल्ली येथे सुरु करण्यात आलेली प्लाज्मा थेरेपी आतापर्यंत सुमारे 900 पेक्षाही अधिक रुग्णांच्या उपचारांसाठी फायदेशीर ठरली आहे. हीच प्लाज्मा थेरेपी आता अमेरिकेतही वापरली जात आहे. दिल्ली सरकारने दावा केला आहे की, कोरोना व्हायरस रुग्णांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अमेरिकेसोबत इतर देशांमध्येही दिल्ली मॉडेल (Delhi Model) वापरले जात आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, 'करोना व्हायरस संदर्भात प्लाज्मा थेरेपी वापरणे पहिल्यांदा दिल्ली येथे सुरु करणयात आले. देशात इतर कोणत्याही ठिकाणी प्लाज्मा थेरेपी वापरण्या आधी ती दिल्लीत वापरण्यात आली. इतकेच नव्हे तर जगातही दिल्लीमध्येच पहिल्यांदा प्लाज्मा थेरेपी ट्रायल करणयात आली. आतापर्यंत प्लाज्मा देऊन 900 जणांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. '
अरविंद केजरीवाल यांनी पुढे म्हटले आहे की, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी घोषणा केली आहे की, आता अमेरिकेतही प्लाज्मा थेरेपी वापरली जाईल. जे काम दिल्लीमध्ये अडीच महिन्यांपूर्वी सुरु झाले ते अमेरिकेत आता सुरु झाले. दिल्ली मॉडेल हे जगभरात चर्चा आणि कुतुहलाचा विषय ठरले आहे. जगभरात चर्चेचा विषय आहे की, दिल्लीमध्ये नागरिका आणि सरकारने आरोग्य विभागाच्या मदतीने कोरना नियंत्रण कसे मिळवले. ' (हेही वाचा, Plasma Therapy: कोरोना मुक्त झाल्यावर किती दिवसांनी करता येणार प्लाझ्मा दान, जाणून घ्या)
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांमध्ये दिल्ली सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणावर घटला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दिल्ली सरकार मोठ्या गर्तेत सापडले आहे. सरकार महसूल वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे.