कोविड-19 संकटात Pfizer कडून भारताला मोठी मदत; 7 कोटी डॉलर्सची औषधं पाठवण्याचा निर्णय

युएस, युरोप आणि आशिया येथील आपल्या डिस्ट्रीब्युशन सेंटरमधून 7 कोटी डॉलर्स किंमतीची औषधं फायझर भारतात पाठवणार आहे.

Pfizer (Photo Credits: IANS)

ग्लोबल फार्मा कंपनी फायझरने (Pfizer) कोविड-19 (Covid-19) संकटात भारताला मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. युएस (US), युरोप (Europe) आणि आशिया (Asia) येथील आपल्या डिस्ट्रीब्युशन सेंटरमधून 7 कोटी डॉलर्स किंमतीची औषधं फायझर भारतात पाठवणार आहे. कोविड-19 काळात भारताला मदत करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याची माहिती कंपनीचे चेअरमन आणि सीईओ Albert Bourla यांनी आज दिली. (भारताला No Profit वर लस देण्याचा प्रस्ताव, अमेरिकेच्या Pfizer कंपनीची घोषणा)

भारतामध्ये सुरु असलेल्या कोविड-19 संकटामुळे अत्यंत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही सर्व भारतीयांच्या पाठीशी उभे आहोत, अशी माहिती कंपनीचे सीईओ यांनी फायझर इंडियामधील सर्व कर्मचाऱ्यांना मेलद्वारे दिली आहे. या गोष्टीची माहिती त्यांनी आपल्या Linkedin पोस्टद्वारे देखील शेअर केली आहे.

कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी आम्ही भारताची शक्य तितकी मदत करुन भारताला साथ देणार आहोत. कंपनीनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मदतीचा प्रयत्न असेल, असे Bourla  म्हणाले.

भारतामध्ये कोविड-19 रुग्णाला बरे करण्यासाठी फायझर औषधांना सरकारीने परवानगी दिल्यानंतर कंपनीच्या युएस, युरोप आणि आशियामधील डिस्ट्रीब्युशन सेंटरचे कर्मचारी औषधाची शिपमेंट तयार करण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. भारतामधील प्रत्येक कोविड-19 रुग्णाला फायझरचे मेडिसिन मिळावे, यासाठी आम्ही या औषधांचे दान करत आहोत. ही औषधं त्यांना मोफत उपलब्ध करुन द्यावी. 7 कोटी डॉलर पेक्षा अधिक किंमत असलेली ही औषधे लवकरच शिपमेंटसाठी तयार होतील.

आम्ही सरकार आणि आमच्या एनजीओ पार्टनरसोबत चर्चा करत आहोत आणि लवकरात लवकर ही औषधे कशी पोहचावीत, याची योजना आखत आहोत, असे Bourla  म्हणाले.