Petrol, Diesel Prices Today: आज पुन्हा इंधन दरवाढ; पहा पेट्रोल, डिझेलचे दर काय?
भारतामध्ये इंधनदरांमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. ही वाढ 41% केवळ एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी आहे.
पेट्रोल (Petrol),डिझेलच्या ( Diesel) किंमतींमध्ये आज (5 ऑक्टोबर) पुन्हा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचे भाव देशामध्ये एका दिवस स्थिर राहिल्यानंतर 25 पैसे तर डिझेलचे दर 30 पैशांनी वाढले आहेत. भारत देश हा त्यांची 85% तेलाची गरज पुरवण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे इंटरनॅशनल ऑईल किंमतींचा इंधनदरांवर परिणाम होत आहे.
भारतामध्ये दररोज सकाळी 6 च्या सुमारास इंधनदर ऑईल कंपन्यांकडून जाहीर केल्या जातात. त्याच्यानंतर प्रत्येक शहरागणिक लोकल टॅक्सच्या आधारे, किंमती ठरवल्या जातात. परिणामी प्रत्येक राज्यामध्ये पेट्रोल, डिझेलच्या वेगवेगळ्या किंमती आहेत. (हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून).
भारतामध्ये आजचा पेट्रोल, डिझेलचा दर
- दिल्ली - पेट्रोल Rs 102.64/ltr आणि डिझेल Rs 91.07/ltr
- मुंबई - पेट्रोल Rs 108.67 आणि डिझेल Rs 98.80/ltr
- कोलकाता - पेट्रोल Rs 103.36/ltr आणि डिझेल Rs 94.17/ltr
- चैन्नई - पेट्रोल Rs 100.23/ltr आणि डिझेल Rs 95.59/ltr
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रुड हे $78 पर बॅरेल पेक्षा जास्त आहे. भारतामध्ये इंधनदरांमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. ही वाढ 41% केवळ एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी आहे. मध्यंतरी काही काळ त्याच्या किंमतींमध्ये घट करण्यात आली होती. पण बराच काळ ऑईल कंपन्यांनी हे दर स्थिर ठेवले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)