Petrol-Diesel Prices Today: मागील 2 महिन्यात आज पहिल्यांदा वाढले पेट्रोलचे दर; जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचा दर

आज पेट्रोलचे दर (Petrol Rates) प्रति लीटर मागे 19 ते 25 पैशांनी वाढले आहेत तर डिझेलचे (Diesel Rates) दर 24 ते 27 पैशांनी वाढले आहेत.

Image Used for Representational Purpose Only (Photo Credits: ANI)

भारतामध्ये आज (28 सप्टेंबर) मागील दोन महिन्यात पहिल्यांदाच पेट्रोलचे (Petrol Price) दर वाढले आहेत. जगात क्रुड ऑईलचे दर 3 वर्षातील उच्चांकी स्तरावर आहेत त्यामुळे देशात त्याचा परिणाम इंधनदरांवर (Fuel Rates) होत आहे. पेट्रोलचे दर (Petrol Rates)  प्रति लीटर मागे 19 ते 25 पैशांनी वाढले आहेत तर डिझेलचे (Diesel Rates) दर 24 ते 27 पैशांनी वाढले आहेत. सध्या देशातील इंधन दर देखील आतापर्यंतच्या उच्चांकी स्थानी आहेत.

मुंबई मध्ये आज पेट्रोलचा प्रति लीटर दर 107.47 रूपये आहे. दिल्लीमध्ये 101.39 रूपये आहे. स्टेट रन ऑईल कंपनींकडून 17 जुलै नंतर पहिल्यांदाच दरवाढ जाहीर केली आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर वाढून 101.87 रूपये झाले आहेत. तर चेन्नई मध्ये पेट्रोल प्रति लीटर 99.15 रूपये आहे. (हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून).

आज डिझेलचे दर मागील आठवडाभरामध्ये चौथ्यांदा वाढले आहेत. मुंबईमध्ये डिझेल 97.21 रूपये प्रतिलीटर आहे. दिल्लीमध्ये 89.57 रूपये आहे. तर कोलकातामध्ये प्रतिलीटर डिझेलसाठी 92.67 रूपये मोजावे लागणार आहेत. चैन्नई मध्ये 94.17 रूपये प्रतिलीटर डिझेल आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

आज इंटरनॅशनल ऑईल प्राईज सलग सहाव्या दिवशी वाढली आहे. दरम्यान दररोज सकाळी 6 वाजता भारतामध्ये इंधनपुरवठा करणार्‍या कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार प्रत्येक राज्यामध्ये कर प्रणाली पाहता पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात.