Petrol-Diesel Price Today: भारतातील 'या' महत्त्वांच्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल च्या किंमतीत किंचितशी घट, जाणून घ्या सविस्तर

तर नवी दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर 90.78 रुपये प्रति लीटर आहे.

Petrol Price In India | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशात गेले काही दिवस पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Rate) किंमतीत जबरदस्त वाढ झालेली पाहायला मिळाले आहे. ही इंधन दरवाढ (Fuel Price) नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. या दरवाढीमुळे अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील वाढले. मात्र कालपासून सलग दुस-या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट झालेली पाहायला मिळाली आहे. ही जनतेसाठी दिलासादायक बातमी असून येणा-या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. GoodReturns ने दिलेल्या आजच्या नव्या दरानुसार, मुंबईत (Mumbai) पेट्रोलचे दर 97.19 रुपये प्रति लीटर आहे. तर नवी दिल्लीत (New Delhi) पेट्रोलचे आजचे दर 90.78 रुपये प्रति लीटर आहे.

तसेच डिझेलच्या दराविषयी बोलायचे झाले तर मुंबईत डिझेलचा आजचा दर 88.20 रुपये प्रति लीटर आहे. तर नवी दिल्तीत डिझेलचा दर 81.10 रुपये प्रति लीटर आहे. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. हेदेखील वाचा- Petrol Diesel Price Today: आज नागरिकांना दिलासा, 24 दिवसानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट

भारतातील महत्त्वांच्या शहरातील आजचे दर:

शहर पेट्रोल (प्रति लीटर रुपये)  डिझेल (प्रति लीटर रुपये)
मुंबई 97.19 88.2
नवी दिल्ली 90.78 81.1
चेन्नई 92.77 86.1
बंगळूरू 93.82 85.99
पाटणा 93.42 86.64
चंदिगड़ 87.36 80.8

पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून सुद्धा तपासून पाहू शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा कोड लिहून 9224992249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा कोड क्रमांक वेगळा असून तुम्हाला तो आयओसीएलच्या वेबसाइटवर मिळू शकतो.

दरम्यान घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीतही वाढ झाली आहे. ही वाढ व नवे दर माहिती करुन घेण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीची वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. येथे कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात नवे दर जाहीर केले जातात. त्यामुळे तुम्ही सुद्धा https://iocl.com/Products/IndaneGas.aspx वर नवे दर तपासून पाहू शकतात. येथे तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या किंमती कळू शकणार आहेत.