Petrol-Diesel Price Today: इंधन दरात पुन्हा एकदा वाढ, गेल्या 37 दिवसात 5.15 रुपयांनी महागले पेट्रोल
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज 19 पैशांनी वाढ झाली आहे.
देशात एक दिवस इंधनाचे दर वाढले नाही तर लगेच पुन्हा आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज 19 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत आता 95.56 रुपये झाली आहे. जी आजवरची सर्वाधिक किंमत आहे. तसेच एक लीटर डिझेलची किंमत 86.47 रुपयांवर पोहचली आहे. यंदाच्या वर्षात 4 मे नंतर आतापर्यंत 22 व्या वेळा पेट्रोल-डिझेल महागले आहे.(New Income Tax E-Filing Portal आज होणार लॉन्च; करदात्यांनो! जाणून घ्या नव्या वेबसाईट बद्दल काही खास गोष्टी)
देशातील विविध भागात पेट्रोलचे दर आकाशाला भिडले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लद्दाखसह सहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात पेट्रोल 100 रुपये प्रति लीटरच्या ही पार गेले आहे. तर मुंबईत एक लीटर पेट्रोलचे दर आता 101 रुपयांवर पोहचले आहेत.
राजस्थानात पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक वॅट लावला जातो. त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा क्रमांक येतो. मुंबई देशातील पहिले महानगर आहे जेथे 29 मे रोजी पेट्रोल 100 रुपयांहून अधिक झाले होते. मुंबईत सध्या पेट्रोल 101.71 रुपये आणि डिझेल 93.77 रुपये प्रति लीटर झाले आहे. या वर्षी 4 मे नंतर पेट्रोल,डिझेलचे दर 22 वेळा वाढले आहेत. या दरम्यान पेट्रोलचे दर 5.15 रुपये आणि डिझेलचे दर 5.74 रुपये प्रती लीटर झाले आहे.(Oxygen Concentrators च्या विक्रीतून 70% पर्यंत व्यापारी नफा कमवायला परवानगी; NPPA एका आठवड्यात जाहीर करेल सुधारित किंमती)
दरम्यान, प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. या मध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टींचा समावेश करुन पेट्रोल-डिझेलचे दर जवळजवळ दुप्पट होतात. याच सोबत आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत त्याच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो.
आजच्या इंधन दराबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही SMS च्या माध्यमातून पाहू शकता. त्याचसोबत HPCL ग्राहकांना HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवून सुद्धा इंधनाचे दर माहिती करुन घेऊ शकता.