Petrol Diesel Price Today: मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकातासह देशातील प्रमुख शहरात इंधन दर स्थिर, पाहा आकडेवारी

काल गुरुवारी (27 मे) देशातील पेट्रोल डिझेलचे दर वाढले. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल, डिझेल महाग होते काय याबाबत देशवासियांना चिंता होती.

Fuel | Representative Image (Photo Credits: Pixabay)

देशातील इंधन दर (Petrol Diesel Price Today) आज (28 मे 2021) स्थिर राहिल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काल गुरुवारी (27 मे) देशातील पेट्रोल डिझेलचे दर वाढले. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल, डिझेल महाग होते काय याबाबत देशवासियांना चिंता होती. मात्र, नागरिकांना आज दिलासा मिळाला. देशातील इंधन दरात ( Fuel Rate in India) कोणतीही वाढ झाली नाही. तेल कंपन्यांनी मे महिन्यात इंधन दर चौदा पटींनी वाढवले आहेत. या आठवड्याचा विचार करायचा तर तेल कंपन्यांनी इंधन दर एकआडएक दिवस याप्रमाणे वाढवले आहेत.

या आठवड्यात तेल कंपन्यांनी पहिल्यांदा मंगळवारी दर वाढवले. त्यानंतर गुरुवारी वाढवले. आज दिलासा दिला असला तरी उद्या हे दर वाढणार नाहीत याची कोणतीच खात्री नाही. तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवून त्या कायम ठेवल्या होत्या. या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जवळपास 3 रुपयांनी वाढल्या आहेत. (हेही वाचा, NHAI: टोल नाक्यांवरील गर्दी, विलंब टाळण्यासाठी 'एनएचएआय'कडून मार्गदर्शक सूचना जारी)

देशातील प्रमुख शहरांमधील इंधन दर (सर्व दर प्रतिलीटमध्ये)

दिल्ली

मुंबई-

कोलकाता

चेन्नई

राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये इंधन दरांनी प्रतिलीटर 100 रुपयांचा आकडा पार केला आहे. नुकत्याच झालेल्या वाढीसह मुंबईतील किंमतीही अधिक वाढीच्या दिशेने जाताान दिसत आहेत. दरम्यान, वृत्तसंस्था रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील आर्थिक सर्व्हेक्शनाच्या आकडेवारीनुसार तिसऱ्या तिमाहिती जागतिक पातळीवरुन इधन मागणी वाढली आहे. यात भारताचाही समावेश आहे. त्यामुळे भारतातील देशांतर्गत तेल दरांच्या किमतीही वाढल्या आहेत.