पेट्रोल डिझेलच्या दरात घट सुरुच ; पेट्रोल 13 पैशांनी तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त, पाहा आजचे दर

ती अजूनही कायम आहे.

पेट्रोल डिझेल दर कपात (Photo Credits: PTI)

पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने घट होताना दिसत आहे. आज पेट्रोलच्या दरात 13 पैशांनी तर डिझेलच्या दरात 12 पैशांनी घट झाली. यामुळेच आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 77.43 रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत 72.19 रुपये प्रति लीटर इतकी आहे. मुंबईत पेट्रोल 72.19 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 75.64 रूपये प्रति लीटर या किंमतीत उपलब्ध आहे. 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट व्हायला सुरुवात झाली. ती अजूनही कायम आहे.

सोमवारी दिल्लीत पेट्रोल 77.56 रूपये प्रति लीटर आणि डिझेल 72.31 रूपये प्रति लीटर इतके होते. तर मुंबईत एक लीटर पेट्रोलची किंमत 83.07 रूपये आणि डिझेल 75.76 रूपये प्रति लीटर किंमतीने विकले जात होते.

दिल्ली आणि मुंबईशिवाय देशातील इतर शहरांमध्येही इंधनाच्या किंमतीत घट झाल्याचे दिसून येते. पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत 79.36 रुपये तर डिझेल 74.05 रुपये प्रती लीटरने विकले जात आहे. याशिवाय चेन्नईत पेट्रोल-डिझेलची किंमत अनुक्रमे 80.42 रुपये प्रति लीटर आणि 76.30 रुपये प्रती लीटर इतकी आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्याने भारतीयांनाही त्याचा लाभ मिळत आहे.