Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग 8 व्या दिवशी वाढ, जाणून घ्या मुंबई, दिल्लीसह प्रमुख राज्यातील इंधनाचे आजचे दर
तर दरवाढीचा आजचा 8 वा दिवस असून राजधानी दिल्लीत पेट्रोल 30 पैसे आणि डिझेल 35 पैशांनी वाढले आहे.
Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून दररोज वाढत आहे. तर दरवाढीचा आजचा 8 वा दिवस असून राजधानी दिल्लीत पेट्रोल 30 पैसे आणि डिझेल 35 पैशांनी वाढले आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचे एका लीटरचे दर 89.20 रुपये आणि डिझेल 79.70 रुपये झाले आहे. तर जाणून घ्या दिल्ली, मुंबईसह अन्य प्रमुख राज्यातील आजचे इंधनाचे दर.(LPG Cylinder Price: आजपासून गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ, गृहिणींचे बजेट कोलमडणार)
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचे दर 95 रुपयांच्या पार गेले आहेत. येथे पेट्रोल 95.75 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.72 रुपये प्रति लीटर झाले आहेत. तर पेट्रोलमध्ये 29 पैसे आणि डिझेलमध्ये 38 पैशांनी वाढ झाली आहे. पण अन्य शहरात सुद्धा रोज नव्याने इंधन दरवाढ होत आहे. राजस्थान मधील गंगानगर मध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत आता 99.81 रुपये झाले आहेत. तर जयपुर मध्ये पेट्रोल 95.73 रुपये प्रति लीटर झाले आहे.(Fastag: आजपासून टोलनाक्यांवर वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य अन्यथा दुप्पट टोल वसूली होणार)
येथे जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर
>> मुंबई: पेट्रोल 95.75 रुपये, डिझेल 86.72 रुपये प्रति लीटर
>>बंगळुरु: पेट्रोल 92.23 रुपये, डिझेल 84.47 रुपये प्रति लीटर
>>चेन्नई: पेट्रोल 91.48 रुपये, डिझेल 84.80 रुपये प्रति लीटर
>>कोलकाता: पेट्रोल 90.54 रुपये, डिझेल 83.29 रुपये प्रति लीटर
तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. त्याचसोबत देशासह राज्यांचे कर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत समावेश केले जात असल्याने त्याच्या मूळ किंमतीपेक्षा ते अधिक दराने विक्री केले जातात.