Budget 2019: पेट्रोल, डिझेल आणि सोनं महागलं; सरचार्ज, कस्टम ड्युटी मध्ये सरकारने केली वाढ

आज बजेटमध्ये मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवताना 1% अधिक सरचार्ज भरावा लागणार आहे. तर सोनं आणि मौल्यवान रत्नांवर 12 % कस्टम ड्युटी आकारली जाणार असल्याने सोनं खरेदी करणं आता महाग होणार आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

मोदी सरकार 2 चं पहिलं बजेट आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलं आहे. या अर्थसंकल्पाकडून सामान्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. आज बजेटमध्ये मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवताना 1% अधिक सरचार्ज भरावा लागणार आहे. त्यामुळे आता नव्या दरांमध्ये किमान 2 रूपयांनी पेट्रोल महाग होण्याची शक्यता आहे. तर सोनं आणि मौल्यवान रत्नांवर 12 % कस्टम ड्युटी आकारली जाणार असल्याने  सोनं खरेदी करणं आता महाग होणार आहे.मागील वर्षी मुंबईमध्ये पेट्रोलच्या दराने प्रति लीटर 80 रूपयांचा टप्पा पार केला होता. पहा केंद्रीय अर्थसंकल्प 2019-20 मधील महत्त्वाच्या घोषणा  

ANI Tweet

पेट्रोल, डिझेल आणि सोनं महागलं असलं तरीही घर घेणं सामान्यांसाठी आता अधिक सुकर केलं आहे. गृहकर्जांवर सरकारने सूट जाहीर केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement