Passenger Suffers Heart Attack On Delhi-Mumbai IndiGo Flight: दिल्ली-मुंबई फ्लाईटमध्ये प्रवाशाला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांनी वाचवला जीव

प्रशांत भारद्वाज यावेळी फ्लाइटमध्ये उपस्थित होते. मुंबईत एका असाइनमेंटसाठी प्रवास करत असलेले डॉ. भारद्वाज म्हणाले की, त्यांनी प्रवाशाचे कुटुंब मदतीसाठी ओरडताना ऐकले. फ्लाइट क्रूने फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर उपस्थित आहेत का? याची विचारणा केली. त्यानंतर डॉ. भारद्वाज यांनी तात्काळ प्रथमोपचार पेटी घेतली आणि प्रवाशावर उपचार करण्यास सुरुवात केली.

Passenger Suffers Heart Attack On IndiGo Flight (फोटो सौजन्य - Pixabay)

Passenger Suffers Heart Attack On Delhi-Mumbai IndiGo Flight: दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट (Delhi-Mumbai IndiGo Flight) 6E 6814 मधील प्रवाशाला शुक्रवारी अचानक हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. मात्र, विमानात उपस्थित डॉक्टरांनी तत्परतेने मदत केल्याने प्रवाशाचे प्राण वाचले. प्राप्त माहितीनुसार, विमान मुंबईत उतरण्यास 45 मिनिटांच्या अंतरावर असताना ही घटना घडली. इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशाला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती.

फ्लाइटमध्ये उपस्थित डॉक्टरांनी वाचवले प्रवाशाचे प्राण -

टाटा मोटर्समध्ये काम करणारे डॉ. प्रशांत भारद्वाज यावेळी फ्लाइटमध्ये उपस्थित होते. मुंबईत एका असाइनमेंटसाठी प्रवास करत असलेले डॉ. भारद्वाज म्हणाले की, त्यांनी प्रवाशाचे कुटुंब मदतीसाठी ओरडताना ऐकले. फ्लाइट क्रूने फ्लाइटमध्ये कोणी डॉक्टर उपस्थित आहेत का? याची विचारणा केली. त्यानंतर डॉ. भारद्वाज यांनी तात्काळ प्रथमोपचार पेटी घेतली आणि प्रवाशावर उपचार करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा -Rate of Heart Attack Increase On Mondays: सोमवारी हृदयविकाराचा सर्वाधिक धोका! डॉक्टरांनी दिला इशारा; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या)

दरम्यान, प्रवाशाने मूर्च्छा, रक्तदाब कमी होणे आणि जास्त घाम येणे अशी तक्रार केली होती. प्रवाशावर उपचार करताना फ्लाइट क्रूनेही डॉक्टरांना मदत केली. डॉ. भारद्वाज यांनी प्रवाशाला औषधे देऊन त्यांची प्रकृती स्थिर केली. (हेही वाचा -BMTC Bus Driver Heart Attack: वाहन चालवताना बीएमटीसी चालकास हृदयविकाराचा झटका; वाहकाने प्रसंगावधान दाखवत थांबवली बस)

विमान कंपनीकडून डॉक्टरांचे कौतुक -

तथापी, या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना डॉ. भारद्वाज म्हणाले की, 'मी प्रवाशाजवळ बसलो आणि उड्डाणाच्या उर्वरित काळात त्याच्यावर लक्ष ठेवले. तसेच त्यांना लँडिंगनंतर पुढील वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला दिला.' तसेच इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवाशाला तातडीने मुंबई विमानतळावर डॉक्टरांनी उपचारासाठी नेले. त्यांनी फ्लाइट क्रू आणि डॉक्टरांच्या सहकार्याचे कौतुक केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif