Cash Management: रोकड व्यवस्थापनासाठी 'इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक' आणि महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड यांच्यात भागीदारी
‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक’ (IPPB) आणि ‘महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल लिमिटेड’ची उपकंपनी असलेल्या महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड (MRHFL) यांनी रोकड व्यवस्थापनासाठी, सामरिक भागीदारी करीत असल्याची घोषणा केली आहे
‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक’ (IPPB) आणि ‘महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल लिमिटेड’ची उपकंपनी असलेल्या महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड (MRHFL) यांनी रोकड व्यवस्थापनासाठी, सामरिक भागीदारी करीत असल्याची घोषणा केली आहे. या कराराचा भाग म्हणून, आयपीपीबी आपली संपर्क केंद्रे आणि टपाल सेवा पुरवठादार यांच्यामार्फत ‘एमआरएचएफएल’ला रोकड व्यवस्थापन आणि संकलन सेवा देणार आहे. रोकड व्यवस्थापन सेवेमुळे ‘एमआरएचएफएल’च्या ग्राहकांना 1,36,000 टपाल कार्यालयांमधून आपल्या कर्जाचे मासिक किंवा तिमाही हप्ते भरता येणार आहेत. रोकड व्यवस्थापनासाठी दोन्ही संस्थांनी केलेली भागीदारी ही वित्तीय सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भागीदारी आहे आणि यातून ग्राहकांना सामावून घेण्याचे दोन्ही संस्थांचे लक्ष्य आहे.
या भागीदारीबाबत बोलताना ‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे. व्यंकटरामू म्हणाले, 'विकसित तंत्रज्ञानामुळे व्यवसाय करण्याचे नवे मार्ग तयार होत आहे. अशावेळी ग्राहकांना आणि भागीदारांना सहज उपलब्ध होणारे व परवडणारे बँकिंग पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात रोख रकमेचे व्यवस्थापन हे व्यवसायाचे कार्यस्थान असते, त्या अनुषंगाने आयपीपीबी आपल्या मजबूत नेटवर्क आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कॉर्पोरेट्सना त्यांच्या प्राप्य वस्तूंचे सुरक्षित व अखंडपणे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते. ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याच्या प्रयत्नात आम्ही 'महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स बरोबर काम करण्यास कटिबद्ध आहोत, तसेच बँकेच्या व्यवहारांपासून वंचित राहिलेल्यांपुढील अडचणी दूर करून त्यांना टपाल खात्याच्या व्यापक कार्यक्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी अखेरच्या टप्प्यापर्यत काम करण्यासही आम्ही तत्पर आहोत.', असेही जे. व्यंकटरामू यांनी सांगितले.
‘महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स’चे व्यवस्थापकीय संचालक अनुज मेहरा म्हणाले, 'आमच्या ग्राहकांचा पाठींबा वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधत असतो. ‘आयपीपीबी’शी करार करणे हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. यातून आमच्या ग्राहकांना कार्यक्षम बँकिंग सेवांमध्ये प्रवेश मिळेल आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व सक्षम बनविण्यात मदत होईल, असा आम्हाला विश्वास आहे'.
विविध प्रत्यक्ष उपक्रम, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, तसेच एसएमएस मोहीम, व्हॉट्सअॅपसह इतर विविध माध्यमातून 'इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक' आणि 'महिंद्रा रूरल हाउसिंग फायनान्स ग्राहकांना रोकड व्यवस्थापनासाठीच्या या अनन्य भागीदारीची माहिती देतील व त्याबद्दल संवेदनशील बनवतील.
‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’ विषयी :
दूरसंचार मंत्रालयाच्या टपाल विभागाच्या अखत्यारीत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) स्थापन करण्यात आली आहे. त्यावर भारत सरकारची 100 टक्के भांडवलासह मालकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 2018 रोजी तिचे उद्घाटन झाले. भारतातील सर्वसामान्यांसाठी सर्वात जास्त सुलभ, स्वस्त आणि विश्वासार्ह बँक तयार करण्याच्या दृष्टीने ही बँक स्थापन केली गेली. बँकेच्या व्यवहारांपासून वंचित राहिलेल्यांपुढील अडचणी दूर करून, 1,55,000 टपाल कार्यालये (1,35,000 ग्रामीण भागात) आणि तीन लाख टपाल कर्मचारी अशा व्यापक कार्यक्षेत्रापर्यंत त्यांना पोहोचविण्याचे 'आयपीपीबी'चे मूळ लक्ष्य आहे.
पेपरलेस, कॅशलेस आणि कमीतकमी उपस्थिती अशी बँकिंग प्रणाली साध्या व सुरक्षित पद्धतीने ग्राहकाच्या दारात पोहोचविणे आणि त्याकरीता ‘सीबीएस-इंटिग्रेटेड स्मार्टफोन’ व ‘बायोमेट्रिक डिव्हाईस’चा उपयोग करणे, या इंडिया स्टँकच्या प्रमुख स्तंभांवर 'आयपीपीबी'ची पोहोच आणि ऑपरेटिंग मॉडेल आधारलेले आहे. कमी खर्चिक स्वरुपाची नावीन्यता आणि सर्वसामान्यांसाठी बँकिंगची सुलभता यांवर लक्ष केंद्रित करून, ‘आयपीपीबी’ने 13 भाषांमध्ये सोपी आणि परवडणारी ‘बँकिंग सोल्यूशन्स'इन्ट्युटिव्ह इंटरफेस’ द्वारे वितरीत केली आहेत. अर्थव्यवस्थेत रोख व्यवहारांचे प्रमाण कमीतकमी असावे, या संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी व ‘डिजिटल इंडिया’चे धोरण बळकट करण्यासाठी आयपीपीबी कटिबद्ध आहे.
‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’ विषयी अधिक माहितीसाठी www.ippbonline.com या संकेतस्थळाला भेट द्या
‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’शी संबंधित इतर चौकशीसाठी संकल्प सैनी ईमेल - Sankalp.s@ippbonline.in वर संपर्क करा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)