8 Rajya Sabha MP Suspended for a week: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज्यसभेत झालेल्या गदारोळ प्रकरणी राजीव सातव यांच्यासह अन्य 7 खासदारांचे निलंबन

विरोधकांकडून उपसभापती हरिवंशच्या विरूद्ध खासदारांनी सादर केलेला अविश्वास प्रस्ताव देखील नियमबाह्य असल्याचं सांगत त्यांनी तो फेटाळून लावला आहे.

File image of Rajya Sabha (Photo credit: IANS)

कोरोना व्हायरस संकटाच्या सावटाखाली दिल्लीमध्ये सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र काल शेतकर्‍यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत काही खासदारांनी गदारोळ घातला होता. त्याप्रकरणी आज राज्यसभेत व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित 8 खासदारांचे पुढील आठवडाभरासाठी निलंबन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांचा देखील समावेश आहे. सोबतच डेरेक ओ'ब्रायन, संजय सिंह, के.के. रागेश, रिपुन बोरा, डोला सेन, सैयद नजीर हुसैन आणि एलामरम करीम यांचा समावेश आहे. कृषी विधेयकाला विरोध करताना काल (20 सप्टेंबर) काहींनी थेट उपसभापतींसमोर (Rajya Sabha Deputy Chairman) जाऊन त्यांचा माईक खेचण्याचा प्रयत्न केला होता. पुस्तिकांच्या प्रती फाडण्यात आल्या होत्या. Farm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या

राज्यसभेचे सभापती व्यकंय्या नायडू यांनी आज सकाळी कामकाज सुरू करताना या प्रकाराची दखल हा राज्यसभेसाठी काळा दिवस होता. जर काल मार्शल्स आले नसते तर खासदारांनी उपसभापतींची काय अवस्था केली असते याचा विचार देखील करवत नाही अशी भावना व्यक्त करत संबंधित 8 खासदारांना निलंबित केलं आहे. सोबतच विरोधकांकडून उपसभापती  हरिवंशच्या विरूद्ध खासदारांनी सादर केलेला अविश्वास प्रस्ताव देखील नियमबाह्य असल्याचं सांगत त्यांनी तो फेटाळून लावला आहे. त्यानंतर काही काळ राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं.

ANI Tweet

काल झालेल्या राज्यसभेतील गदारोळाबाबत सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'अशाप्रकारची घटना आतापर्यंत राज्यसभा किंवा लोकसभा मध्ये झालेली नाही. कालचा राज्यसभेत झालेला प्रकार नींदनीय आहे तो सभागृहाच्या प्रतिमेला साजेसा नाही.' अशी प्रतिक्रिया देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. तर केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी देखील विरोधकांच्या गोंधळाचा समाचार घेतला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now